

आसावरी कुलकर्णी
तांबडी सुर्ल येथील देऊळ राजा शिवचित्त पेरमाडी देव यांच्या कमला देवीवरच्या असीम प्रेमाचेही प्रतीक आहे.
गोमंत तारकांविषयी लिहिताना इतिहासाची पाने धुंडाळणे गरजेचे आहे. मागच्या सदरात म्हटल्याप्रमाणे गोव्याचा एकूणच इतिहास थोडा धुरकटलेला आहे. त्यात स्त्रियांच्या योगदानाबद्दल काही सापडणे म्हणजे समुद्रात सुई शोधल्यासारखे आहे. काही लोकांनी लिहिलेल्या लेखामधून काही थोडके हाताला लागले तेच मांडण्याचा हा प्रयत्न.
गोव्यावर ११ व्या शतकापासून कदंब राजघराण्याने राज्य केले हे सर्वश्रुत आहे. याच कदंब कुळातील एक राणी कमलादेवी या गोमंतकीय महिलांसाठी नक्कीच आदर्श असे व्यक्तिमत्त्व ठरेल.
बाराव्या शतकाच्या सुरुवातीला कदंब राजा शिवचित्त पेरमाडी याचे राज्य होते. काही दस्ताऐवज आणि शिलालेख यामधून राणी कमलादेवी ही राजाची पट्ट राणी होती हे समजते.ती सोमवंशाच्या प्राचीन पंड्या घराण्यातील वंशज होती. श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही प्रजेला भेदभाव न करता वागवणारी राणी म्हणून तिचे वर्णन आढळते.
शिक्षणाची मोठी आश्रयदाता होती. पती शिवचित्त पेरमाडी यांच्या मदतीने अनेक अग्रहारांची स्थापना केली. इथे वेद, वेदांग, न्याय, मीमांसा सांख्य इत्यादी विषय शिकवले जायचे . असे म्हटल जाते की एला ब्रम्हपुरी इथेही अश्या प्रकारचे अग्रहाराची स्थापना झाली होती.सप्तकोटेशवर हे कादंबाचे कुलदैवत होते.
त्यामुळे कमलादेवी यांनी गोव्यातील, सप्तकोटशवर, कमलेशवर तसेच तांबडी सुर्ल येथे महादेवाचे देऊळ बांधले. यात असलेली कमलाकृती प्रतीक राणीच्या स्थापत्य शास्त्रातील रुची ही स्पष्ट दिसून येते.
तांबडी सुर्ल येथील देऊळ राजा शिवचित्त पेरमाडी देव यांच्या कमला देवीवरच्या असीम प्रेमाचेही प्रतिक आहे. त्याच प्रमाणे देगाव येथील विष्णूचे देऊळ बांधले, नवदुर्गा, महालक्ष्मी अशा देवतांची देवळे बांधली. तत्कालीन शैव, वैष्णव आणि जैन धर्मातील वादविवादावर आपल्या व्यापक मानसिकतेने कमलादेवीने विजय मिळवला होता.
शिवचित्त पेरमाडी देव यांच्या कारकिर्दीत त्यांनी राज्यकारभारातही सक्रिय सहभाग घेतला होता. राणी कमलादेवी राजा शिवचित्ताकडे देगाव येथे अग्रहार बांधण्याची विनंती घेऊन गेल्या तेव्हा त्यांनी आपली आई मैलामहादेवी यांचा सल्ला घेतला.
यावरून कदंब प्रशासनात महिलांनी कशी महत्त्वाची भूमिका बजावली, हे स्पष्ट होते. इतकेच नव्हे एका शेतात सापडलेल्या मूर्तीवरून त्या शिकारसाठी जायच्या हेही आपल्याला कळते.
राणी कमलादेवी यांचे जीवन गोव्यातील सर्व महिलांसाठी निश्चितच आदर्श आहे. शिक्षण, धर्म आणि प्रजेच्या कल्याणासाठी त्यानी बहुमोल असे योगदान दिले. धार्मिक सहिष्णुता आणि बहुलवादाचे आदर्श त्यानी ठेवला.
या गुणी राणीची फारशी ओळख नाही आणि गोव्याच्या इतिहासातील तिच्या योगदानाची नीट दखल घेतली जात नाही, ही खेदाची बाब आहे. त्यांच्या संतती बद्दल तसेच मृत्युबद्दल फारशी माहिती नाही. तरीही गोमंतकाच्या इतिहासातील त्या एक लखलखणाऱ्या तारकाच होत्या असे म्हणायला हरकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.