Goa News 13 January: सिकेरी हत्याकांड, बाबूश - पर्रीकर वाद, पॅलेनस्टाइन पाठिंबा प्रकरण सोबतच राज्यातील अन्य घडामोडी एका क्लिकवर

Goa Breaking News 13 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...
Goa Live Updates 13 January 2024 |
Goa Live Updates 13 January 2024 |Dainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट- बागा किनारी भागातील हॉटेल्सची जीएसटी, ऑडिट तपासणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यावसायिक आणि विक्रीकर विभागाने कळंगुट येथील नाईट क्लबवर छापा टाकला. कळंगुटमधील डान्सबार सील केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. डान्सबारमधील आस्थापनांचे जीएसटी रेकॉर्ड तपासण्यात आलंय.

सूचनाला शिक्षा होवो अथवा ती कोठडीत राहो, आम्हाला फरक पडत नाही- वकील अझर मिर

चिन्मयचा मृत्यू झाल्याने व्यंकटरमण याने आपले आयुष्यातील सर्वस्व गमावले आहे, तो पूर्णतः खचून गेला आहे. त्यामुळे संशयित सूचना हिला शिक्षा होऊ किंवा ती कोठडीतच राहिल्यास आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण चिन्मय जगात नाही. आम्हाला कुठल्याही न्यायाची अपेक्षा नाही, सूचनाला राग होताच तर तिने तो व्यंकटरमणवर काढायचा होता. चिन्मयचा जीव घेऊन कुणाचेच बरे झाले नाही : व्यंकटरमण यांचे वकील अझर मिर

बाबूशने आताच राजीनामा द्यावा! पणजीत पर्रीकर समर्थक महिला गरजल्या

मंत्री बाबूश मोन्सेरातांनी 2027ची वाट बघू नये, आताच राजीनामा द्यावा आणि निवडणूकीला सामोरे जावे. पणजीतील पर्रीकर समर्थक महिला मोन्सेरातांवर कडाडल्या. बाबूश आणि पुत्र रोहित मोन्सेरात यांचा प्रशासनावर काहीच ताबा नसल्याचा केला आरोप.

म्हापसा पोलिसांचा अंमली पदार्थांवर छापा; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

म्हापसा येथे पोलिसांनी अंमली पदार्थांवर छापा टाकला असून या कारवाईत 30 किलो गांजा आणि 5 किलो चरस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या मालाची बाजार किमंत 55 लाख रुपये असून याप्रकरणी मनीष महाडेश्वर याला म्हापसा पोलिसांनी अटक केली

सिकेरी हत्याकांड: कोर्टाच्या आदेशानंतरही 5 रविवार मुलाला भेटू दिले नाही!

संशयित सूचनाचा पती व्यंकटरमणने कळंगुट पोलिसांंना आतापर्यंत दिलेल्या माहितीत, त्यांच्यामध्ये मुलाच्या कस्टडीवरून न्यायालयीन लढाई सुरू होती. यात कोर्टाने दर रविवारी मुलाला भेटायची परवानगी व्यंकटरमणला दिली होती. त्यानंतर सूचनाने काही रविवार बाप-मुलाला भेटू दिले. मात्र त्यानंतरचे पाच रविवार त्यांची भेट होऊ दिली नाही. त्यानंतर सहाव्या रविवारी मुलाच्या हत्येची घटना घडली. व्यंकटरमणचा अधिकृत जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे.

suchna seth case
suchna seth case

रणजी क्रिकेट सामन्यात दीपराज गावकरचे पहिले शतक

गोव्याच्या दीपराज गावकर याचे पर्वरी येथे चंडीगडविरुद्ध रणजी क्रिकेट सामन्यात शतक. २५ वर्षीय फलंदाजाचे सहाव्या सामन्यात पहिलेच रणजी शतक.

हजारोंचा गंडा घालून गोव्याला जाण्याचा प्लॅन, मैत्रिणीसोबत विमानात बसताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हजारो रुपयांचा गंडा घालून गोव्याला पलायन करण्याचा प्लॅन फोल ठरला. 29 वर्षीय तरुण गोव्याला उड्डाण करण्यासाठी विमानात बसताच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अ‍ॅपल आयफोन 14 प्रो (iPhone 14 PRO) सवलतीच्या किंमतीत देतो असे सांगून चोरट्याने गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ED ची चौकशी त्याच दिवशी गोवा दौरा; अरविंद केजरीवाल घाबरत असल्याचा भाजपचा आरोप

कथित दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स बजावण्यात आले आहे. या समन्समध्ये ईडीने केजरीवाल यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे.

विशेष म्हणजे सीएम अरविंद केजरीवाल 18 तारखेलाच गोवा दौऱ्यासाठी रवाना होणार असून 20 जानेवारीपर्यंत ते तिथेच राहणार आहेत. याआधीही केजरीवाल यांनी ईडीच्या तीन समन्सना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले होते.

मडगाव नगराध्यक्ष पदावर कामिलो बार्रेटो यांचा दावा

मडगाव नगराध्यक्ष पदावरून मडगाव पालिकेत धुसफूस. 15 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने विद्यमान नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी खाली उतरावे अशी नगरसेवक कामिलो बार्रेटो यांची मागणी. सदानंद तानावडे यांनी आपल्याला नगराध्यक्ष बनविण्याचे आश्वासन दिल्याचा दावा.

सूचनाचा पती व्यंकटरमण कळंगुट पोलीस स्थानकात हजर

सिकेरीत झालेल्या 4 वर्षीय खून प्रकरणात सूचनाचा पती व्यंकटरमणला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स जारी केले होते. त्यानुसार आज (13 जानेवारी) व्यंकटरमण कळंगुट पोलीस स्थानकात हजर झाला असून याप्रकरणी चौकशीअंती नवीन माहिती समोर येण्याची शक्यता.

कुडचडेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Curchorem Crime News: कुडचडेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करमलवाडा येथील मोहिद्दीन हुलगुर (30) याच्याविरुद्ध कुडचडे पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पॅलेनस्टाइनला पाठिंबा देण्यासाठी म्हापशात 'एकता मार्च'

Israel-Palestine War: इस्राइल-पॅलेस्टाइन युद्धाचा म्हापशात पडसाद. म्हापशात पॅलेनस्टाइनला पाठिंबा देण्यासाठी समर्थकांचे 'एकता मार्च'. पोलिसांनी म्हापसा मार्केट गेटवर मार्च थांबवले. समर्थकांकडील साहित्य जप्त. त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याची माहिती.

वरुणापुरी जंक्शनवरील अपघातात एकाचा मृत्यू

Accidental Death in Varnapuri: वरुणापुरी जंक्शनजवळ भीषण अपघात. रुतूल चुटीया (34, आसाम) याचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक. यामुळे चालकाचा जागीच मृत्यू. हा अपघात काल (12 जानेवारी) रात्री घडला.

खनिज वाहतुकीविरोधातील आंदोलन पेटले!

Mayem Mining Issue: खनिज वाहतुकीविरोधातील आंदोलन पेटले. गोवा फॉरवर्डचे संतोष सावंत यांच्यासह तिघा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. उपजिल्हाधिकारी, मामलेदार आंदोलनस्थळी दाखल. नागरिक आपल्या भुमिकेशी ठाम.

खनिज वाहतुकीविरोधात 'एल्गार'..!

Goa Mining: खनिज वाहतुकीवरून मयेत तणाव. संतप्त मयेवासीयांनी वाहतूक पुन्हा रोखली. आंदोलनस्थळी पोलीस दाखल. गावातील अंतर्गत रस्त्याने खनिज वाहतुकीला नागरिकांचा विरोध. मयेवासीय मागणीशी ठाम.

सावधान! मडगावनंतर डिचोलीमध्येही डेंग्यूचे सक्रिय रुग्ण; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Dengue Cases in Goa: सध्या डिचोलीमध्ये डेंग्यूचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. वर्षाच्या अखेरीस अनेकदा साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता डेंग्यूने राज्यात पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.41

Panjim ₹ 97.41

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.97

Panjim ₹ 89.97

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com