श्री सत्य साई सेवा समितीची मानवसेवा

कोवीड काळात दीन दिनदुबळ्यांच्या आणि विशेषत: शहरातील फुटपाथवर उपाशी पोटी राहाणाऱ्याना एक वेळचे अन्न देण्याचे काम समितीने केले.
श्री सत्य साई सेवा समितीची मानवसेवा
श्री सत्य साई सेवा समितीची मानवसेवा Dainik Gomantak

सत्य,धर्म,शांती,प्रेम,आणि अहिंसाची शिकवण देणारे श्री साई बाबांच्या आध्यात्मिक संदेशाचे प्रचार करणे ही एक गोष्ट झाली. पण मानव सेवा ही देखीलच तितकी महत्वाची सेवा असेच मानून वास्कोत श्री सत्य साई सेवा समिती कार्यरत आहे.

कोवीड काळात दीन दिनदुबळ्यांच्या आणि विशेषत: शहरातील  फुटपाथवर  उपाशी पोटी राहाणाऱ्याना एक वेळचे अन्न देण्याचे काम  समितीने केले. कोरोना काळात घराबाहेर पडणे तसे जिकरीचे होते. भिकाऱ्यांना भीक मागणे किंवा मजुरांना  मजुरी करून पोट भरणे शक्य नव्हते.अश्या  परिस्थितीत त्यांना   जेवण देऊन त्यांना  मदत करावी या उद्देशाने समितीने  जून 2021 पासून गेले साडेचार महिने दुपारच्यावेळी   पाकीटातून अन्न  देणे सुरु केले. समितीची सेवादले  वास्को रेल्वे स्टेशन, जोशी चौक, व शहरातील इतर ठिकाणच्या फुटपाथवर व धार्मिक स्थळे असलेल्यां ठिकाणच्या  सर्वांना   अन्न पाकिटांचे  वाटप करतात. दिवसाला 25 ते 30 पाकिटे ते पुरवतात..

Dainik Gomantak

कोरोन काळात वास्कोच्या चिखली इस्पितळात कोरोनाने बाधीत असलेल्या रूग्णांना दिड महिने फळे व फळांच्या रसांची पाकिटे देण्यांत समिती सतत पुरवत होती. बोगमाळो येथील  वृध्दाश्रमाच्या स्लॅबला जेव्हा गळती लागून आंतमध्ये पाणी झिरपू लागले होते तेव्हा समितीने अखिल गोवा श्री सत्य साई सेवा संघटनेच्या सहकार्याने या वृध्दाश्रमाच्या स्लॅबवर पत्र्यांचे आवरण  घालण्यात आले.तिथल्या  शौचालयाची  व  नळांची खराब झालेली पाईपे बदलून दिली.व संर्पूण वृध्दाश्रमाच्या बाहेर साफसफाई करून तिथे निवासाला असणाऱ्या वृध्दांना मोठा दिलासा दिला. या कामासाठी समितीमार्फत सुमारे एक लाख रूपयांच्यावर खर्च  करण्यात आला.

श्री सत्य साई सेवा समितीची मानवसेवा
गोव्यात खाजेकरांची खास मिठाई

गेल्या अनेक वर्षांपासून समितीतर्फे महिन्याच्या  प्रत्येक रविवारी चिखली   इस्पितळातील रूग्णांना   आणि  बोगमाळो येथील वृध्दाश्रमातील  रूग्णांना  फळांचे वाटप करण्यात येते. अखिल गोवा संघटनेतर्फे  गोव्यातील मंगेशी फोंडा, कुर्टी फोंडा,  वांते सत्तरी व   तिवाडा - धारगळ  येथे नैर्सगिक आपत्तीमुळे ज्या  गरीब लोकांची घरे जमीनदोस्त झाली होती तेथे स्वखर्चातून त्यांना  नवीन घरे बांधून देण्यात आली. वास्कोतील गोवा शिपयार्ड समोर   एक घर उभारून देण्याचे निश्र्चित  केले आहे. संघटनेकडे असलेले 10 ऑक्सिजन  काॅन्सेंट्रेटर कोरोना काळात  गोव्यातील सर्व तालुक्यातील  गरजूना डॉक्टरांच्या  परवानगीने गरजेनुसार  पुरविण्यात आले.

वास्को समितीचे अध्यक्ष महेश सिंगबाळ., दक्षिण गोव्याचे अध्यात्मिक समन्वयक उमा राव, पी.एम.पटेल, कॅप्टन एस.पी सिंग ,यांच्यासह समितीचे इतर सदस्य समितीच्या या दैनंदिन सेवेत कुठेही खंड पडू देत नाहीत. अखिल गोवा श्री सत्य साई सेवा संघटनेचे अध्यक्ष महेश पाऊसकर व समन्वयक अनिल पेडणेकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com