History of Goa: म्हणून गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटले

पोर्तुगीज (Portuguese)अधिकारी व्हाईसरॉयनी भारताच्या सामीलनाम्यावर सही करताच गोवा अधिकृतरित्या भारताचा भाग बनले.
History of Goa

History of Goa

Dainik Gomantak 

Published on
Updated on

भारताला 15 ऑगस्ट 1947 साली जरी स्वातंत्र्य मिळाले तरी आपल्या देशातील गोवा, दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीवर मात्र, पोर्तुगीजांचेच राज्य होते. भारत सरकारने (Indian Government) ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून लष्करी कारवाई करत गोव्यासह ही राज्ये पोर्तुगिजांच्या गुलामगिरी राजवटीतून 19 डिसेंबर 1961 साली मुक्त केली. पोर्तुगीज अधिकारी व्हाईसरॉयनी भारताच्या सामीलनाम्यावर सही करताच गोवा अधिकृतरित्या भारताचा भाग बनला. भारतीय उपखंडाच्या पूर्ण स्वातंत्र्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्याला 'गोवा मुक्ती दिन' (Goa Liberation Day) असे संबोधले जाते. गोव्याच्या इतिहासातील (History of Goa) सर्वात महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक म्हणून ओळखला हा जातो.

<div class="paragraphs"><p>History of Goa</p></div>
मंगलमय स्मृती गोवा मुक्तिदिनाच्या

लष्करी कारवाईचे प्रमुख असलेले मेजर जनरल के.पी.कँडेथ यांच्याकडेच गोव्याच्या (Goa) प्रशासनाची जबाबदारी त्यावेळी देण्यात आली होती. मिलिटरी गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. 20 डिसेंबर 1961 ते 6 जून 1962 या काळात म्हणेजच जवळजवळ 6 महिने त्यांनी गोव्याचा कार्यभार संभाळला. त्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून टुमकूर शिवशंकर यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी 29 सदस्यीय मंडळाच्या साहाय्याने गोव्याचा कारभार सांभाळला. 7 जून 1962 पासून 1 सप्टेंबर 1963 पर्यंत त्यांनी गोव्याचा कारभार संभाळला.

गोवा 450 वर्षे पोर्तुगीजांच्या राजवटीत गुरफटत होता. पोर्तुगीजांनी भारताच्या काही भागांमध्ये वसाहती निर्माण केल्या होत्या. त्यात गोवा, दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीवर त्यांचे नियंत्रण होते. ते सोडण्यास त्यांनी नकार दिला होता. अगदी भारताला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर देखील. जरी मुक्ती चळवळ 20 व्या शतकाच्या सुरुवातीलाच सुरू झाली असली तरी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीपासून प्रेरणा घेऊन 1940 च्या दशकात तिला गती मिळाली. पोर्तुगीजांशी अयशस्वी वाटाघाटी आणि राजनैतिक प्रयत्नानंतर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे लष्करी हस्तक्षेप हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. 18 डिसेंबर 1961 पासून लष्करी कारवाईचे आयोजन करण्यात आले होते. पोर्तुगीजांवर आक्रमण करत बळाने त्यांच्या ताब्यातून हे राज्य मिळविण्यात आले, लष्कराने यासाठी एक योजना आखली त्याला 'ऑपरेशन विजय' हे नाव देण्यात आले. यात भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने केलेल्या हल्ल्यांचाही समावेश होता. तब्बल 36 तास सुरु असलेल्या या लढ्याला अखेर यश मिळाले. भारतीय सैन्याने गोव्याच्या प्रदेशावर कोणताही प्रतिकार न करता पुन्हा दावा केला आणि जनरल मॅन्युएल अँटोनियो व्हॅसालो ई सिल्वा यांना शरणागतीच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, अशा प्रकारे 19 डिसेंबर 1961 रोजी या भूभागावरील पोर्तुगीजांच्या 451 वर्षांच्या शोषणात्मक राजवटीचा अंत झाला. भारतीयांनी त्यांच्या विजयाचा आनंद साजरा केला, तर या निर्णयाला आंतरराष्ट्रीय समुदायांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेकांनी भारताने केलेल्या या कारवाईचे कौतुक केले आणि भारताच्या पाठीशी उभे राहिले. परंतु पोर्तुगालसह इतर अनेक देशांनी भारतीय सैन्याने गोव्यावर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला.

गोव्यासह देशभरात 'गोवा मुक्ती दिन' (Goa Liberation Day) हा दिवस गोव्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून निघालेल्या टॉर्चलाइट मिरवणुकीने याची सुरुवात होते जी शेवटी आझाद मैदानावर संपते. या ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. देशाचे सर्वात लहान राज्य स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्षात प्रवेश करत असताना, तेथे पोर्तुगालच्या संस्कृतींचे मिश्रण आजही पहावयास मिळते. तरी देखील या राज्याने स्वतःचे एक विशिष्ट स्थान कायम ठेवले आहे. राज्याने पर्यटन क्षेत्रात जगातीक पातळीवर अग्रगण्य नाव मिळविले आहे. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले देशातील राज्य म्हणजे गोवा आहे. गोवा लोकसंख्येच्या दृष्टीने चौथा सर्वात लहान, कोकण म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात भारताच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले, महाराष्ट्र राज्य उत्तरेला, कर्नाटक पूर्वेला आणि दक्षिणेला, तर अरबी समुद्राने त्याचा पश्चिम किनारा तयार केला आहे.

<div class="paragraphs"><p>History of Goa</p></div>
Goa Liberation Day: पोर्तुगिजांविरुद्ध अतुलनीय धैर्य दाखवणाऱ्या 'सुधाताई'

गोवा नाव कसे पडले

गोवा हे नाव पोर्तुगीजांकडून युरोपीय भाषेमध्ये आले, परंतु त्याचे नेमके मूळ अद्याप अस्पष्ट आहे. भारतीय महाकाव्य महाभारत आता गोवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्राला 'गोपाराष्ट्र' किंवा 'गोराष्ट्र' म्हणून संबोधतो, ज्याचा अर्थ गोपाळांचे राष्ट्र आसा आहे. 'गोपकापुरी' किंवा 'गापकपट्टण' हे काही प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये आणि इतर पवित्र हिंदू ग्रंथांमध्ये आढळते. हरिवंश आणि स्कंद पुराण म्हणून, नंतरच्या काळात, गोव्याला "गोमंचाल" म्हटले गेले आहे. गोवे, गोवापुरी, गोपकपट्टण आणि गोमंत हे पुराणांसारख्या ग्रंथांमध्ये प्रदेशाच्या नावांची इतर उदाहरणे आहेत.

गोव्याची संस्कृती

ख्रिसमस (Christmas), इस्टर संडे, गणेश चतुर्थी (चवोथ-कोंकणी), दिवाळी, नवीन वर्षाचा दिवस, शिग्मो आणि कार्निव्हल हे गोव्यातील सर्वात लोकप्रिय उत्सव मानले जातात. 1960 च्या दशकापासून, शिग्मो आणि कार्निव्हलचे उत्सव शहरी भागाकडे देखील वळले आहेत. अलीकडच्या काळात बरेच लोक त्या उत्सवांना देशी उत्सवांऐवजी पर्यटकांना आकर्षित करण्याचे साधन म्हणून पाहतात.

गोव्यात पाश्चात्य इंग्रजी गाणी तसेच पारंपारिक कोकणी लोकगीतांनाही येथे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. लोक खास प्रसंगी, एकोणिसाव्या शतकात उगम पावलेले पारंपारिक गोवा संगीत मांडो असून, ते गात येथील त्यावर नृत्यही करतात. गोवा त्याच्या ट्रान्स संगीतासाठी प्रसिद्ध आहे. त्याला गोव्यातील लोकांचे आवडते इंग्रजी गाणे असेही म्हटले जाते. याचा गोव्याचे इंग्रजी गीत म्हणूनही उल्लेख केला गेला आहे. देखन्नी, फुगडी आणि कोरिडिन्हो हे काही पारंपारिक गोव्यातील नृत्य प्रकारांचे प्रतिनिधित्व करतात.

गोवन आहारातील फिश-करी आजही प्रसिध्द

फिश-करी सह भात गोव्यातील मुख्य आहार मानले जाते. गोव्यात अनेक पाककृतींसह शिजवलेल्या फिश डिश प्रसिध्द आहेत. मिरची, मसाले आणि व्हिनेगरसह येथे स्वयंपाकात नारळ आणि खोबरेल तेलाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. येथील गोवन फूडची चव बराच काळ जिभेवर रेंगळते. मोठ्या प्रसंगी, समारंभात कॅथलिक लोक डुकराचे मांस बनवून खातात. Khatkhate या नावाने ओळखल्या जाणार्‍या गोवन व्हेजिटेबल स्टू, हिंदू आणि ख्रिश्चन सणांच्या वेळी खूप लोकप्रिय आहे. Khatkhateमध्ये किमान पाच भाज्या, ताजे खोबरे आणि खास गोव्याचे मसाले असतात जे याची चव आणि सुगंध वाढवतात. बेबिंका नावाने ओळखला जाणारा एक समृद्ध अंडी-आधारित बहु-स्तरीय गोड पदार्थ ख्रिसमसमध्ये बनविला जातो तो गोव्यात खूप प्रसिध्द आहे. गोव्यातील सर्वात लोकप्रिय अल्कोहोलिक पेय म्हणून फेणीचे वेगळेपण आहेच; काजूच्या झाडाच्या फळांच्या किण्वनातून बनवलेली काजू फेणी आणि ताडीच्या रसापासून बनवलेली नारळाची फेणी, या दोन मोठ्या प्रमाणात आढळतात.

गोव्यात दोन जागतिक वारसा स्थळे

बॉम जीझस बॅसिलिका आणि काही नियुक्त कॉन्व्हेंट्स. बॅसिलिकामध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव अवशेष आहेत, ज्यांना अनेक कॅथलिक गोव्याचे संरक्षक संत मानतात. दर दशकातून एकदा पुजेसाठी आणि पाहण्यासाठी ठेवण्यात येते. वेल्हास कॉन्क्विस्टास प्रदेश गोवा-पोर्तुगीज शैलीतील वास्तुकला आकर्षित करते.

गोव्याच्या अनेक भागांत इंडो-पोर्तुगीज शैलीतील वास्तू आजही पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेतात. तरीही काही वास्तूंची दुरवस्था झाली आहे. पणजीममधील फॉन्टेनहास, एक सांस्कृतिक क्वार्टर म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे गोव्याचे जीवन, वास्तुकला आणि संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारे संग्रहालय मानले जाते. पोर्तुगीज काळातील काही प्रभाव गोव्याच्या मंदिरांमध्येही आपल्याला दिसून येतात. यात विशेषत: मंगेशी मंदिर, त्याची 1961 नंतर, अनेकदा डागडुजी करण्यात आली असून, स्थानिक भारतीय शैलीत त्याची पुनर्बांधणी केली गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com