History and Cultures of India: दाक्षिणात्य होयसळ साम्राज्य

जैन गुरू सुदत्त यांना वाचवण्यासाठी श्री सळ या तरुणाने सिंहाला मारल्याच्या कथेवरून राजवंशाचे नाव होय आणि सळ या कन्नड शब्दावरून आले
History of India
History of IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

तामिळनाडूतील चोलांप्रमाणे होयसळांनी कर्नाटकावर आपली स्वतंत्र छाप सोडली, मग ती राज्याची संस्कृती, वास्तुकला, साहित्य किंवा धर्म असो.

बहुतेक प्राचीन साम्राज्यांप्रमाणे, होयसळांच्या उत्पत्तीची स्वतःची आख्यायिका होती, जैन गुरू सुदत्त यांना वाचवण्यासाठी श्री सळ या तरुणाने सिंहाला मारल्याच्या कथेवरून राजवंशाचे नाव होय आणि सळ या कन्नड शब्दावरून आले आहे, ही घटना साम्राज्याचे प्रतीकदेखील आहे.

तथापि ऐतिहासिक अहवालांनुसार, सन 950 मध्ये श्री अरेकल्ला हा पहिला सरदार सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर होयसळ साम्राज्याची उभारणी करणारा खरा संस्थापक श्री विष्णुवर्धन होता. गंगवाडीचा राज्यपाल म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, त्याने आपला भाऊ श्री वीर भल्लाळ (पहिला) नंतर गादी हाती घेतली.

याने गंगवाडीच्या चोल प्रदेश, संपूर्ण निलगिरी, बनवासीचे कदंब, तुलुनाडूचे अलुप यांच्यापासून सुरू झालेल्या विजयांची मालिका सुरूच ठेवली. त्याच्या अमलाखाली, होयसळ साम्राज्याने केरळचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा उत्तर भाग, जुने म्हैसूर, तुलुनाडू आणि मलनाडचा काही भाग व्यापला.

History of India
ते कोण आहोत?

हे केवळ दक्षिणेतच नव्हते तर चालुक्य शासक श्री विक्रमादित्य सहाव्याच्या विरोधात मोहिमेचे नेतृत्वही केले. यशाच्या मालिकेसह तो लवकरच कृष्णा नदीपर्यंतचा बहुतांश उत्तर कर्नाटक ताब्यात घेण्यास आला.

सिंदाचा प्रमुख श्री अचुगी याच्याकडून पराभूत झाला असला तरी, चालुक्य शासक श्री विक्रमादित्य सहाव्याच्या निधनानंतर त्याने बानकपुरा, उचंगी पुन्हा ताब्यात घेतले आणि लवकरच कृष्णा-तुंगभद्र दोआब प्रदेशातील मोठ्या भूभागावर कब्जा केला.

श्री वीर भल्लाळ दुसरा, होयसळ घराण्यातील सम्राटांपैकी महान मानला जातो. चालुक्यांचा र्‍हास झाल्याने यादव, कलचुरी आणि होयसळ यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला. बसवकल्याणाची चालुक्य राजधानी काबीज करण्यात यादवांना यश आले असले तरी त्यांच्याशी अधिक तीव्र संघर्ष हा कृष्णा-तुंगभद्र दोआब प्रदेशासाठी होता.

यादव शासक श्री भिल्लम्मा विरुद्ध लहान राज्यांच्या नाराजीचा फायदा घेऊन, श्री वीर भल्लाळ दुसरा याने त्याला महत्त्वपूर्ण युद्धांमध्ये पराभूत केले आणि होयसळ साम्राज्य कृष्णा नदीपर्यंत नेले. त्याने पदच्युत चोल शासक श्री कुल्लोथुंगा तिसरा याला पांड्यांच्या विरोधात मदत केली आणि त्यांच्या सैन्याला परतवून लावले आणि चोलांची पुन्हा स्थापना करण्यात मदत केली.

त्याच्या आधिपत्याखाली, होयसळ साम्राज्याने कर्नाटकचा बहुतांश भाग आणि अगदी उत्तर तामिळनाडूचा काही भाग व्यापला. श्री विष्णूवर्धनाप्रमाणे श्री वीर भल्लाळ कला आणि साहित्याचे संरक्षकही होते. एक महान कन्नड कवी जन्ना, तसेच जैन कवी नेमीचंद्र त्यांना लाभले.

History of India
Protection Of Environment: सृष्टी आणि परमेष्ठी

श्री वीर नरसिंह तिसरा, चोलांच्या वतीने त्यांचा पदच्युत शासक राजराजा तिसरा याच्या बाजूने लढत, आणि पांड्यांचा शासक सुंदर पंड्या यांचा पराभव करत चांगले काम चालू ठेवले. किंबहुना त्यांचा शेवटचा शासक वीर बल्लाळ तिसरा याच्या मृत्यूपर्यंत, होयसळांनी संपूर्ण दख्खन आणि तमिळनाडूचा मोठा भागही ताब्यात घेतला.

होयसळांनीच दिल्ली सल्तनतच्या मुस्लीम आक्रमणकर्त्या सैन्याचा सर्वांत कठोर प्रतिकार केला, प्रथम अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर मोहम्मद बिन तुघलक यांनी केलेल्या हल्ल्यानंतर, १४व्या शतकाच्या उत्तरार्धात होयसळ साम्राज्य कोसळले.

हलेबीड, बेलूर आणि सोमनाथपुरा ही शहरे सुलतानाच्या सैन्याने लुटली आणि उद्ध्वस्त केली . तोच काळ होता, जेव्हा काकती, यादव, चालुक्य यांसारखी दख्खनची इतर प्रमुख राज्येही कोसळून एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.

विजयनगर साम्राज्याचे संस्थापक, हरिहर आणि बुक्क रायाच्या उत्पत्तीसंबंधीच्या सिद्धांतांपैकी एक असे सांगतो की त्यांचे वडील संगमा वीर बल्लाळ तिसराच्या अंतर्गत होते आणि भाऊ होयसळ शासकाच्या आधिपत्याखाली होते.

पी. बी. देसाईंसारख्या विद्वानांनी मांडलेला हा एक सिद्धांत आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की हरिहर पहिला वीर बल्लाळच्या सैन्यात सेनापती होता आणि त्याने प्रदेशांचा विस्तार करण्यात मोठी भूमिका बजावली.

विजयनगराची स्थापना सन 1336 च्या आसपास, तुंगभद्रा नदीवर, होसापट्टणाच्या नावाखाली आधीच झाली होती, आणि नंतर हळूहळू सत्तेचे हस्तांतरण झाले, जेव्हा होयसळांचा नाश होऊ लागला.

या राज्यांतील सैनिक, सेनापती, सरदार, इस्लामी आक्रमणाला आळा घालणारे नवीन नेतृत्व आणि सत्तेचे केंद्र शोधू लागले. आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी विजयनगरचा उदय झाला. हंपीचे हलेबीड, बेलूर आणि वीर बल्लाळ तिसरा याच्या दुःखद मृत्यूमुळे होयसळ साम्राज्यातील बहुतेक रहिवासी विजयनगरला स्थलांतरित होतील याची हरिहरराया आणि बुक्कराया यांना खात्री होती .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com