पेंटिंग ऑफ द वीक

ॲनिमेशन हे तिचे कार्यक्षेत्र असले तरी चित्रकलेतून मिळणाऱ्या आनंदासाठी ती चित्र रंगवते व त्याचा फायदा तिला तिच्या क्षेत्रात काम करताना देखील होतो.
Prasanthi Chinduri
Prasanthi ChinduriDainik Gomantak

प्रसांथी चिंदुरी

गोवा वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशनची सदस्या प्रसांथी चिंदुरी ही ॲनिमेशन क्षेत्रात काम करते. तिने चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र चित्रकारितेची आवड असल्यामुळे ती असोसिएशन बरोबर जुळली गेली आहे व गेली दोन वर्षे ती असोसिएशनच्या बाह्यस्थळ चित्रकला सत्रांना हजेरी लावत आहे.

असोसिएशनच्या ज्येष्ठ आणि अनुभवी चित्रकारांबरोबर काम करू करून आपल्याला खूप शिकायला मिळाले असे ती सांगते. जेष्ठ चित्रकारांकडून मिळणारे मार्गदर्शन व कौतुक खूप महत्त्वाचे आहे असे तिला वाटते. ॲनिमेशन हे तिचे कार्यक्षेत्र असले तरी चित्रकलेतून मिळणाऱ्या आनंदासाठी ती चित्र रंगवते व त्याचा फायदा तिला तिच्या क्षेत्रात काम करताना देखील होतो.

Prasanthi Chinduri
Blog: वर्ण संकल्पनेचा विचार

सध्या पावसाळी वातावरण असल्याने असोसिएशनची बाह्यस्थळ सत्रे होत नसली तरी दर रविवारी त्यांचे सदस्य आपापल्या ठिकाणी, त्यांना देण्यात येणाऱ्या संदर्भ छायाचित्रांवरून चित्र रंगवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या रविवारी त्यांच्या एकंदर 17 सदस्यांनी अशाप्रकारे चित्रे रंगवली. प्रसांथी हिने जुन्या सचिवालयाच्या फोटोवरून आपले चित्र रंगवले आहे.

सबंध चित्राला उजळ ट्रीटमेंट देताना चित्रामधल्या प्रत्येक घटकाचा रंगविषयक एकजिनसीपणा तिने राखला आहे. चित्राच्या पूर्वभागी असलेल्या इमारतीचा सफेद रंग, पार्श्वभूमीवर असलेल्या क्षितिजावरच्या पांढुरक्या ढगांपर्यंत रस्त्याच्या फिकट निळ्या-पांढऱ्या रेषेने जोडला गेला आहे. त्यामुळे एक उठावदार उजळ असे स्वरूप सबंध चित्राला लाभून ते पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com