Blog : ‘संवगां’एकांकिका संग्रहाचे लोकार्पण

‘ओल्यो यादी’ या पुस्तकासाठी आगियार यांना 2017 मध्ये कोकणी भाषा मंडळाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
जॉन आगियार
जॉन आगियारDainik Gomantak
Published on
Updated on

रोमन कोंकणी लिपीतील एकांकिकांचे संकलन असलेले, जॉन आगियार यांचे नवीन पुस्तक ‘संवगां’, बुधवार 19 जुलै रोजी  कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात लोकार्पण होणार आहे. गोवा तियात्र अकादमीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याप्रसंगी गुलाबचे संपादक आणि प्रसिद्ध संशोधक श्री फॉस्तोव्ह डिकोस्टा  या पुस्तकावर बोलतील.

आगियार यांचे आतापर्यंत चार कोंकणी कवितां संग्रह, इंग्रजी निबंधांचे एक पुस्तक आणि "मांडवीच्या  देगेवयल्यान" हे रोमन लिपीतील कोकणी निबंधांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘ओल्यो यादी’ या पुस्तकासाठी आगियार यांना 2017 मध्ये कोकणी भाषा मंडळाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.

सामाजिक विषयांवर स्थानिक वृत्तपत्रांमधून त्यानी अनेक लेख लिहिले आहेत. 2010 मध्ये मंगळूर येथील कलांगणच्या ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ या विभागात, जागतिक कोकणी संगीत पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन करण्यात आले होते. त्यांना साहित्यासाठी राज्य सरकारचा ‘कला गौरव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जॉन आगियार
Blog : तियात्र सादरीकरण झाले महाग

आगियार यांनी 2011 मध्ये गुलाब लेखक पुरस्कार जिंकला. 2012 मध्ये त्यांना साहित्यासाठी नवहिंद टाइम्सचा माजी एनसीसी अचिव्हर पुरस्कार मिळाला. डिसेंबर 2007 मध्ये गृहरक्षक दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना "गोवा मुख्यमंत्री सुवर्ण पदक" मिळाले आणि 2015 आणि 2020 मध्ये ते राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Best Wedding Destination Award
Mahadev Shinde National Teacher Award 2026
Virat Khdapkar six year old Goa boy Kedarnath world record
Teachers role in shaping new generation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com