आयुष्य फुल विक्रीत गेले, महामारी आली आणि गणित फिसकटले

फोंड्यातील फूल विक्रेत्यांची व्यथा; व्यवसाय ठप्प; रोजीरोटीचे हाल
फोंड्यातील फूल विक्रेत्यांची व्यथा
फोंड्यातील फूल विक्रेत्यांची व्यथाDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कोविडच्या (Covid-19) महामारीत काही घटकांना मोठी झळ बसली. त्यात फूल (Flowers)विक्रेत्यांचा समावेश हा प्रामुख्याने करावा लागेल. नोकरी नसल्याने काही लोकांनी फूल विक्रीचा व्यवसाय (Business) स्वीकारला, तर काहीजणांनी आपला पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी फूल विक्री सुरू केली. आतापर्यंत सगळे ठीक होते, कष्ट करून तासन् तास उभे राहूनही फुलांची चांगली विक्री व्हायची. घरात चार पैसे आणायला मिळत होते आणि घरखर्चही भागायचा, पण कोविडची महामारी आली आणि सगळेच गणित फिसकटले. आता दीड वर्ष झाले तरी अजून हे लोक सावरलेले नाहीत. कोविड संख्या कमी झाल्याने थोडाबहुत व्यवसाय सुरू झाला असला तरी संसार चालवण्याएवढी आमदनी मिळत नसल्याची खंत या फूल विक्रेत्यांनी केली आहे. (Goa: Plight of florists in ponda Business stalled)

अंत्रुज महाल ही गोव्याची सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यातील सर्वांत जास्त देवळे ही फोंडा महालातच आहेत आणि दरवर्षी प्रत्येक देवालयात होणारे वार्षिक उत्सवांची संख्याही मोठी आहे. म्हणावा तेवढा व्यवसाय नसल्याने रोजीरोटी चालवण्यासाठी अन्य कुठला व्यवसाय स्वीकारायचा ही विवंचना फोंड्यातील फूल विक्रेत्यांना लागून राहिली आहे. कोविडची महामारी कमी झाली असल्याने नजीकच्या काळात ही महामारी नाहिशी होऊ दे रे बाबा... अशी आर्त हाक फूल विक्रेत्यांकडून दिली जात असल्याचे चित्र फोंड्यातील बहुतांश देवस्थानात दिसत आहे.

फोंड्यातील फूल विक्रेत्यांची व्यथा
या गोमंतकीयांना कोणी घर देता का घर...

एक हजार कुटुंबे अवलंबून

फूल विक्रीच्या व्यवसायावर फोंडा तालुक्यात किमान एक हजार कुटुंबे विसंबून असतील, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. या व्यवसायावरच रोजीरोटी चालवणाऱ्या या कुटुंबातील सदस्यांना फुलांची निगा राखण्याबरोबरच पहाटे फुले गोळा करणे, त्यांच्या माळा करणे, फोंडा शहरात जाऊन परराज्यातून येणाऱ्या झेंडू तसेच शेवती व इतर फुलांची खरेदी करून त्यांच्या वेण्या घालणे, हार गुंफणे आदी काम करावे लागते. मात्र या कामात गेल्या वर्षभरात खंड पडला असून आता कुठे सुरवात झाली आहे.

प्रसिद्ध जायांनाही मागणी घटली

एरव्ही फोंड्यातील विशेषतः म्हार्दोळ भागातील जायांना मोठी मागणी असायची, पण गेल्या वर्षापासून जायांना मागणीच नाही. कोविडमुळे गेल्या वर्षी सगळेच बंद झाले होते. आता हळूहळू खुले होत असले तरी एरव्ही मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद यंदा काही दिसत नाही, असे हे फूल विक्रेते निराशपणे सांगतात.

फोंड्यातील फूल विक्रेत्यांची व्यथा
Goa Container ship service: मुरगाव बंदराचे सर्व शुल्क माफ

आयुष्य गेले फुल विक्रीत महामारी जाऊ दे रे बाबा

फूल विक्री करून आयुष्य घालवले. आता कोरोनामुळे आफत आली त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत देण्याची गरज आहे. केवळ पाच हजार नव्हे तर मदतीचा आकडा वाढवायला हवा.

- रामनाथ नाईक

आता श्रावण महिना सुरू झाला आहे. चतुर्थी जवळ ठेपली आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा होणार आहे. या काळातच फुलांची जास्त विक्री होते, त्यामुळे परमेश्‍वरा निदान आता तरी कोविडची महामारी पूर्णपणे जाऊ दे रे बाबा...

- मंगला गावकर, फोंडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com