Goan Culture: गोव्याची मिश्र संस्कृती

काळाप्रमाणे होणाऱ्या बदलांपासून संस्कृती अलिप्त आणि अप्रभावित राहू शकत नाही, हे सांस्कृतिक कट्टरतावाद्यांना समजू शकत नाही.
Goan Culture
Goan CultureDainik Gomantak
Published on
Updated on

सुशीला सावंत मेंडीस

गोव्याची एकच एक अशी ओळख जगाला दाखवणे कठीण आहे. ऐतिहासिक घटना, भूतकाळ असे वेगवेगळे पैलू त्याला आहेत. हा पट रंगांच्या इतक्या विविध छटांनी विनटलेला आहे की, त्याला एकाच रंगात रंगवणे चुकीचे ठरेल.

सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ लोकांच्या बहु-सांस्कृतिक अभिव्यक्तींमधील सर्व भिन्नता तपासतात. भारत स्वतः एक बहु-सांस्कृतिक, बहु-भाषिक, बहु-पांथिक समूह आहे आणि त्याच्या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. संस्कृती नेहमीच प्रवाही आणि संवादी असते.

जर एखादा गोमंतकीय पावभाजीऐवजी डोसा खाण्यास प्राधान्य देत असेल तर तो ‘गोंयकार’ उरत नाही का? एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या खाण्यापिण्यावरून किंवा अगदी पेहराव आणि संगीताच्या आवडीनिवडींवरून ठरवता येत नाही. आमची तरुण पिढी डूलपॉड्स आणि मंडोपेक्षा रॅप आणि पॉप संगीताला प्राधान्य देत असेल तर ते गोव्याशी प्रतारणा करणारे ठरतात का?

विविध कारणांमुळे अनेक गोमंतकीय लोक त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेपेक्षाही अस्खलित इंग्रजी बोलतात, ते गोव्याचे नाहीत? भारताच्या इतर भागात काम केलेले अनेक जण त्यांच्या निवृत्तीचा कालावधी आपल्या मूळ गावी घालवण्यासाठी गोव्यात परतले आहेत.

बाजारपेठेत कोकणी बोलताना ते चाचपडतात, तरीही गोवा त्यांना आपले घरच वाटते. अनेक गोवा आफ्रिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये स्थलांतरित झाले आणि त्यांची मुले, नातवंडे कोकणी किंवा मराठी बोलायला कधीच शिकली नाहीत, पण तरीही ते स्वतःची ओळख जगभरात गोमंतकीय म्हणून अभिमानाने करून देतात. त्यांचे मूळ गोमंतकीय असणे, आपण नाकारू शकतो का?

काळाप्रमाणे होणाऱ्या बदलांपासून संस्कृती अलिप्त आणि अप्रभावित राहू शकत नाही, हे सांस्कृतिक कट्टरतावाद्यांना समजू शकत नाही. सांस्कृतिक समन्वयाचा, एकत्र जीवन जगण्याचा आदर करणे, ही काळाची गरज आहे! भाषा, पेहराव, पंथ किंवा पाककृती ही संस्कृतीची वैयक्तिक अभिव्यक्ती असली, तरी तिला संस्कृतीचे कधीही न बदलणारे प्रतीक मानता येऊ शकत नाही.

आपल्या वैचारिक जखडण्याला न्याय देण्यासाठी आपल्यापैकी काही जण आर्य आक्रमणकर्त्यांशी स्वतःचा संबंध जोडतात, पण पोर्तुगीजांनंतर झालेल्या सांस्कृतिक प्रभावाला विरोध करतात. गोव्यातील मुस्लिम राजवटीचा प्रभाव किंवा पोर्तुगीजांचा गोव्यातील चार शतकांहून अधिक काळचा सांस्कृतिक प्रभाव आपण जाणीवपूर्वक टाळू शकतो का?

पोर्तुगीजांनी आपल्यावर ४५० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. एका स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी असल्याने आमच्या घरात पोर्तुगीज भाषेवर बंदी होती. आज हीच भाषा माझ्या इंडो-पोर्तुगीज इतिहासात चालू असलेल्या संशोधनासाठी एक महत्त्वाचे साधन आहे आणि पोर्तुगीज हीसुद्धा सुंदर भाषा आहे.

माझ्या आईने, त्या काळातील स्त्रियांप्रमाणेच नेहमी साडी, केसात फुलांचा गजरा, डोक्याला कुंकू लावत असे आणि माझे वडील गांधी टोपी, पायजमा आणि कुर्ता १९६१ पूर्वी नेसायचे. या निवडी निषेधाचे प्रतीक होत्या आणि ते ज्या काळात जगले त्या काळाशी सुसंगत होत्या.

जरी ही प्रतीके त्यांचे राजकीय लागेबांधे स्पष्ट करत असली, तरी त्यांनी तो धोका पत्करला. तोे वसाहतीचा काळ होता आणि पोर्तुगीज वसाहतवाद्यांना विरोध करणाऱ्यांनी पोर्तुगीजांना लक्ष्य केले होते.

आजचा काळ वेगळा आहे. खरे तर, माझे संशोधन करण्यासाठी आणि माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे पोर्तुगालमध्ये तीन महिने राहण्यापूर्वी मला देश आणि तेथील लोकांबद्दलचा माझ्या स्वतःच्या काही समजुती, काही पूर्वग्रह होते. मात्र, पोर्तुगीज लोकांनी मी त्यांचीच असल्याप्रमाणे माझे स्वागत केले.

नॅशनल आर्काइव्ह्जच्या बाहेरील सुरक्षा रक्षक माझे नाव वाचून म्हणाले, ‘तू मेंडीस आहेस, मग तू आमच्यापैकी एक आहेस’. पुरातन पोर्तुगीज कागदपत्रे वाचण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत काही तास घालवले आणि मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले.

मी आयुष्यभरासाठी चांगले मित्र बनवले. ते लोकशाहीवादी होते ज्यांनी सालाझारशाहीचा तिरस्कार केला होता. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, आपल्याला बदल आत्मसात करण्याची व मुक्त राहण्याची गरज आहे.

गोमंतकीय संस्कृती ही अंशतः प्राच्य आणि अंशतः पाश्चात्य अशा दोन संस्कृतींचे मिश्रण आहे. पोर्तुगीज राजवटीने गोव्याच्या भूमीवर भारतीय आणि पोर्तुगीज या दोन राष्ट्रांमध्ये परस्परसंवाद घडवून आणला, ज्याचा परिणाम म्हणून स्वतःच्या ओळखीसह समृद्ध संस्कृतीचा विकास झाला.

आपली लोककथा, पेहराव, पाककृती, अद्वितीय संगीत आणि नृत्य, वास्तुकला (निवासी आणि पांथिक दोन्ही), फर्निचर, दागिने (हिंदू, मुस्लिम आणि पोर्तुगीज), आपल्या कोकणीतील पोर्तुगीज शब्द, चित्रे आणि प्रतिमाशास्त्र, अगदी आपले कायदे आणि आपली अद्वितीय कोमुनिदाद व्यवस्था. आपल्या अद्वितीय गामंतकीय संस्कृतीची प्रतीके आहेत.

१५५६मध्ये गोव्यात प्रिंटिंग प्रेसची स्थापना आणि आशियातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्या स्थापनेची कारणे विचारात न घेताही, गोवावासीयांसाठी वरदान ठरले.

अल्बुकर्कने पॉलिटिका डॉस कॅसामेंटोस (विवाह धोरण) आणले. यामुळे पोर्तुगीज नागरिक आणि मूळ गोमंतकीय स्त्रिया यांच्यातील विवाह संबंधांना प्रोत्साहन मिळाले. पोर्तुगीजांशी एकनिष्ठ वर्ग निर्माण करणे हा त्यांचा हेतू असला तरी, या धोरणामुळे गोव्यातील लोकसंख्येच्या एका भागामध्ये परदेशी संस्कृतीचा प्रसार होण्यास मदत झाली.

आज कोकणी आणि मराठी दोन्ही भाषांनी पोर्तुगीजला दत्तक घेतले आहे. त्यांच्या शब्दसंग्रहातील शब्द, उदा. खोमीस(कॅमिसा), साबण(साबाओं). चाय(चवे) इत्यादी अनेक शब्द पोर्तुगीजमधून स्थानिक भाषांत आले आहेत.

पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्याचे बहुतेक खाद्यपदार्थ शाकाहारी होते. लाल मिरची, काजू, टोमॅटो, बटाटे, अननस, पेरू, ढब्बू मिरची आणि भोपळा यासारखी अनेक फळे आणि भाज्या पोर्तुगीजांनी गोव्यात आणल्या. फादर व्हिक्टर फेर्राव म्हणातात की, ‘त्यांनी बटाटे आणले आणि आम्ही बटाटेवडे बनवले’.

Goan Culture
Pernem Accident News: मालपे येथे स्वयं अपघातानंतर कारला लागली आग; चालक जखमी

पोर्तुगीजांनी अमेरिकेतून तंबाखू, मलाक्कामधून फिलीपिन्समधून पपई, आफ्रिकेतून शेंगदाणे आणले. त्यांनी गोव्यातील लोकांना ब्रेड बेकिंगची कलाही शिकवली. ख्रिश्चन गोवन खाद्यपदार्थांमध्ये विंडालू, बालचाओ, सोरपटेल, मोल्हो, सॉसेज, रिसोइस दी केमराओ (कोळंबी भरून अर्ध्या चंद्रासारख्या आकाराच्या लहान पफ) आणि बेबिंकाचा गोड पदार्थ यांचा समावेश होतो.

आर्किटेक्चरमध्ये राजांगण किंवा अंगण, ‘बलकांव’ किंवा उघडा व्हरांडा आणि कलात्मक छत, खिडक्या यांचा समावेश केला आहे आणि आज गोमंतकीय संस्कृतीचे घटक म्हणून अभिमानाने मिरवत आहेत. गोव्याच्या फर्निचरमध्ये कमळ आणि सूर्यफूल आणि काजू फळांचे आकृतिबंध कोरलेले आहेत.

कमळ हे विद्येची देवी सरस्वतीचे सिंहासन आहे. गोव्यात घरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये खुर्चीच्या मागील बाजूस सजवण्यासाठी त्याची निवड सामान्य आहे. या हस्तकलेत प्रवेश करणारी उघड भारतीय चिन्हे म्हणजे समुद्राचा सर्प देव, गरुड, सूरजमुखी मत्स्य, पिंपळ आणि वडाची पाने, मच्छीमार, बोटी. कौशल्य आणि कल्पनांच्या या संमिश्रणामुळे अद्वितीय इंडो-पोर्तुगीज फर्निचरचा जन्म झाला.

Goan Culture
Blog : लळा जिव्हाळा...

व्हाईसरॉयची सुंदर नक्षीकाम केलेली खुर्ची, ‘म्युझिओ दी आर्त अँटिगा’मध्ये जतन करून ठेवली आहे आणि ती कुंकळ्ळीच्या सुतारांनी बनवलेली आहे. माचीचा किंवा पालखींचा उपयोग विशेष अधिकाऱ्यांकडून वाहतुकीचे साधन म्हणून केला जात असे.

चेस्ट, अल्मिरह (कपाटे), कॉन्तादोर (भौमितिक नमुन्यांची जडणघडण असलेली कॅबिनेट), रॉकिंग खुर्च्या आणि इतर प्रकारचे लाकूड, हस्तिदंत, हाडे, धातू किंवा मोत्याच्या कवचाने जडण्याच्या इंटार्सिया कलेचा वापर कोरीव कामात केल्यामुळे त्यांचे मूल्य वाढले.

ख्रिश्चन, मुस्लिम आणि इंडो-पोर्तुगीज दागिने वेगळे आहेत. अनेक ख्रिश्चन महिलांकडे मंगळसूत्रात पेंडंट म्हणून क्रॉस असतो. गोव्यातील ख्रिश्चन स्त्रियांमध्ये मॅलाकाइट स्टोन, कोरल स्टोन, कॅमिओ वापरून मीनाकारी आजही लोकप्रिय आहे.

Goan Culture
LLB Exam Scam: बट्ट्याबोळ

सांस्कृतिक हट्टाग्रह असणाऱ्या लोकांना बदलत्या मिश्र संस्कृतीचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक आहे. पक्षपाती राजकारणाच्या स्वतःच्या मर्यादा आहेत पण सांस्कृतिक समरसता गोव्यासारख्या बहु-बहुलवादी समाजात आदर आणि एकता निर्माण करते. ‘सांस्कृतिक अस्मितेचे जतन’ यासारख्या शब्दांनी विशिष्ट विचारधारेला अनुरूप संस्कृती लादली जाऊ शकत नाही.

सतत बदलणाऱ्या वातावरणाशी परस्परसंवाद आणि रुपांतरे आकार घेतात आणि कोणत्याही समूहाच्या संस्कृतीवर परिणाम करतात. सांस्कृतिक नमुने कधीही स्थिर किंवा बाह्य समावेशाला विरोध करणारे असू शकत नाहीत.

आज, पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांचे वडील हे गोव्यातील एक उत्कृष्ट लेखक आहेत, ज्यांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. समाज पुढे जातात आणि प्रगती करतात, आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत, मग भारतीय असो वा पोर्तुगीज. विभाजन नाश करते.

हे आत्मसात करण्याचे आणि भरभराटीचे युग आहे. बहुलवादाच्या स्वीकृतीचा सुगंध, एकतेची खात्री करून आणि पुढे जाण्याचा सुगंध नेहमीच फुटीरता आणि मागे सरकण्याच्या दुर्गंधीला संपवून टाकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com