History of India: गुजरातची महाराणी कदंब घराण्याची राजकन्या

कर्णदेव सोलंकी हा गुजरातच्या चालुक्य घराण्यातील एक राजा. कर्णाचा विवाह कदंब राजा जयकेशी यांची राजकन्या मायनल्ला किंवा मीनलदेवी हिच्याशी झाला.

History of India
History of IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

राजा कर्णदेव सोलंकी (इ.स. १०६४-१०९२) हा गुजरातच्या चालुक्य (सोलंकी) घराण्यातील एक राजा. त्याने आपली राजधानी अनाहिलापट्टका (आधुनिक पाटण-गुजरात) इथून सध्याच्या गुजरात आणि आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य केले.

राजा कर्ण याचा विवाह कदंब राजा जयकेशी कदंब पहिला (इ.स. १०५०-१०८०) यांची राजकन्या मायनल्ला किंवा मीनलदेवी कदंब हिच्याशी झाला. हे लग्न कसे झाले याचे परस्परविरोधी वर्णन विविध आख्यायिकांमध्ये आहे.

कवी हेमचंद्राच्या बाराव्या शतकातील द्वैश्रयानुसार मायनल्ला किंवा मीनलदेवी ही अत्यंत सुंदर कदंब राजकन्या होती. एकदा तिने राजा कर्ण याचे एका चित्रकाराने काढलेले चित्र पाहिले. कर्णच्या रूपाने मोहित होऊन तिने इतर सर्व इच्छुकांना नाकारले आणि त्याच्याशी लग्न कर्ण्याचा निर्धार केला.

वडील जयकेशी कदंब यांच्या संमतीने तिने स्वत:चे चित्र घेऊन एका कलाकाराला कर्णाच्या दरबारात पाठवले. कदंब राजाने कर्णसाठी हत्तीसह भेटवस्तूही पाठवल्या. कर्ण जेव्हा त्या गुणी हत्तीला पाहण्यासाठी बागेत गेला तेव्हा त्याला राजकुमारी त्याची वाट पाहत बसलेली दिसली. त्याने काही प्रश्न विचारून तिची ओळख पडताळून पाहिली आणि मग तिच्याशी लग्न केले.

कवी मेरुतुंगाच्या चौदाव्या शतकातील प्रबंध-चिंतामणीनुसार मायनल्लादेवी किंवा मीनलदेवी ही कदंब राजा जयकेशी पहिला यांची राजकन्या होती. एके दिवशी तिला तिचे गतआयुष्य आठवले. त्या पूर्वजन्मात त्या धर्माभिमानी शैव होत्या, त्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाण्याचा बेत आखला होता. मात्र, गुजरातच्या राज्यकर्त्यांनी लादलेला तीर्थकर भरता न आल्याने तिला बहुलोदा येथे रोखण्यात आले.

जेव्हा मायनल्लाला किंवा मीनलदेवी हिला तिच्या मागील जन्मातील हा प्रसंग आठवला, तेव्हा तिने गुजरातच्या राजाशी लग्न कर्ण्याचा आणि हा अन्यायकारक कर माफ कर्ण्याचा निर्णय घेतला. तिच्या आग्रहाखातर तिचे वडील जयकेशी कदंब पहिला यांनी कर्णाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला, पण कर्णाने त्या राजकन्येला नाकारले.

त्यानंतर मायनल्ला आपल्या आठ महिला साथीदारांसह कर्णाच्या दरबारात आली आणि तिने आत्महत्येची धमकी दिली. कर्णाने अजूनही तिच्याशी लग्न कर्ण्यास नकार दिला, परंतु त्यांचा मृत्यू पाहू न शकल्याने कर्णाची आई उदयमतीने आपण मुलींसह मरणार असल्याचे जाहीर केले. परिणामी कर्णाला माघार घ्यावी लागली.

त्याने मायनल्लाशी लग्न केले, पण तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिला. अखेर एका मंत्र्याच्या मदतीने त्यांना जिंकता आले. नंतर त्यांनी आपला मुलगा महाराजा जयसिंह सिद्धराजा याला तीर्थकर माफ कर्ण्यासाठी राजी केले. याला आणखी एका इतिहासकारानेही दुजोरा दिला आहे.


History of India
वृक्षारोपण, संस्कृती आणि देवराई

काश्मिरी कवी बिल्हाना यांनीही या घटनेचा उल्लेख केलेला दिसतो. कर्णाच्या दरबारात त्यांनी काही काळ मुक्काम केला आणि कर्णला नायक म्हणून सादर कर्णाऱ्या ‘कर्ण-सुंदरी’ या काव्यनाटकाची रचना केली. या कार्यानुसार कर्णाने राजकन्येचे (ज्याला कर्णसुंदरी किंवा कर्णाची सुंदर स्त्री म्हटले जाते) स्वप्न पाहिले आणि तिच्याशी लग्न कर्ण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या ईर्ष्याळू राणीने कर्णसुंदरीच्या वेशभूषेत लपलेल्या मुलाशी त्याचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णाच्या चतुर मंत्र्याने तिची योजना हाणून पाडली. बिल्हान हा कर्णाचा समकालीन असला तरी त्याचे वर्णन हे नाटक अथवा काव्य असावे. असे असले तरी या विवाहाच्या तारखेचा अंदाज बांधण्यासाठी त्यांचे वर्णन उपयुक्त ठरते.


History of India
'नंदनवन’ ची रंगलेली पार्टी आणि रात्री हाडामांसाचा चिखल करणारा ‘किलर स्टेट’ मधील बाणस्तारीचा अपघात.... विश्लेषण

बिल्हान कदाचित इ.स. १०७२ ते १०७८ च्या दरम्यान कर्णाच्या दरबारातून निघून गेला असावा. कर्णसुंदरी ही मायनल्लासारखीच आहे, असे गृहीत धरले तर कर्णाचा तिच्याशी विवाह याअगोदर कधीतरी झाला असेल.

हेमचंद्र आणि बिल्हान या दोघांनीही चालुक्य संरक्षणाखाली लेखन केले, त्यामुळे कर्णाच्या राणीचे सकारात्मक चित्रण कर्ण्यात त्यांचा स्वार्थ होता. मेरुतुंगा अशा कुठल्याही दबावाखाली नव्हता, पण त्याचे वर्णन काल्पनिक आणि ऐतिहासिक त्रुटींनी भरलेले आहे.

गुजरातमध्ये विरमगाम आणि ढोलका येथे तलाव बांधण्याचे श्रेय मायनल्लादेवी यांना जाते. साबरकांठा जिल्ह्यातील बालेज गावातील मीनल बावडी तिच्या कार्यकाळातील असून ती इ.स. १०९५ मध्ये बांधण्यात आली.

राजकोट जिल्ह्यातील नडियाद मधील एक बावडी आणि वीरपूरमधील मीनलदेवी वावदेखील तिच्याशी संबंधित आहे व चालुक्य स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com