यंदा इफ्फीच्या (IFFI 2021) दरम्यान ‘गोवन वॉटर कलर असोसिएशन’ने (Govan Water Color Association) या नावाने जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन. ‘गोवा मनोरंजन संस्थे’च्या आर्ट गॅलरीत आयोजित केले आहे. युतीच्या काळात देश-विदेशातील प्रतिनिधींची हजेरी या संकुलात बऱ्यापैकी असते. त्यामुळे या असोसिएशनच्या सदस्यांना आपल्या प्रदर्शनासाठी आपल्या जलरंगातील चित्रांच्या (Watercolor painting) प्रदर्शनासाठी एक चांगले व्यासपीठ लाभले आहे.
गोव्यात (Goa) जलरंग चित्रकारितेला लोकप्रिय बनवण्यामागे या संस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. संस्थेच्या कालिदास सातार्डेकर, गोविंद सिलिमखान या चित्रकारांना तर त्यांच्या जलरंगातल्या चित्रांसाठी राष्ट्रीय (National) आणि आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर सन्मानही लाभले आहेत.
‘स्प्लॅश’ या प्रदर्शनाला बरा प्रतिसाद लाभत आहे. असोसिएशनशी संलग्न असणार्या वीस चित्रकारांनी या प्रदर्शनात भाग घेतलेला आहे. यापैकी सर्व सदस्यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नसले तरी असोसिएशनच्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिक कार्यशाळा ना हजेरी लावून व सतत सराव करून त्यातल्या अनेकांनी जलरंगांवर आपले प्रभुत्व मिळवले आहे. जलरंग चित्रकारीता त्यांनी छंद म्हणून जोपासली असली तरी, त्यात त्यांनी गंभीरपणे काम केले आहे हे या प्रदर्शनातली चित्रेपाहून लक्षात येते. हे प्रदर्शन 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.