Goa Election: ‘पर्रीकर’ पणजीत परत येणार...

मनोहरभाईंच्या निधनानंतर पणजीचा कार्यकर्ता हरवला.
Manohar Parrikar Former Minister of Defence of India
Manohar Parrikar Former Minister of Defence of IndiaDainik Gomantak

राजकारणात सतत शेअर बाजारासारखी उलाढाल होत असते. निवडणुका जाहीर व्हायच्याच आहेत. बेडूक उड्या सुरू झाल्या. वातावरणात वेगवेगळे रंग दिसायला लागले. उमेदवार आपापल्यापरिने बाह्या खेचून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले. गोव्याची राजधानी पणजी, तिथे कोण असेल रिंगमास्टर याचे आडाखे बांधणे चालू झाले. लढाईत कोण उतरणार त्यावर वार होतील. पणजीचा मतदार सुसंस्कृत, सुशिक्षित आहे, ताे शांत आहे. यंदाची पणजीची निवडणूक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ठरवणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

मनोहरभाईंच्या निधनानंतर पणजीचा कार्यकर्ता हरवला. मनोहर पर्रिकर हे कलंदर व्यक्तिमत्त्व, ज्यांना समजल, त्यांना समजलं. ज्यांना हा माणूस ओळखता आला नाही तो त्यांचं दुर्दैव. झपाटल्यागत कार्यकर्त्यांच्या झुंडी सकाळ ना दुपार न पाहता केव्हाही त्यांच्याबरोबर प्रचारासाठी जात. त्यात कुणालाही आमंत्रण द्यावे लागत नसे. पैसा तर दुर्मिळच. स्वतःच्या खर्चाने कार्यकर्ता ठरलेल्या ठिकाणाहून प्रभातफेरी निघावी तसे निघत. प्रत्येक कार्यक्रमाचा महत्त्वाचा वेळ ते भाईंसाठी देत. भारावून जाणे काय असतं ते कार्यकर्त्यांना ठावूक आहे. गरज आहे ते चांगल्या नेत्याची. मनोहरभाई दाणदाण पावल घालत चालत त्यांच्याबराेबर चालणं हे ही आव्हानच. ते पेलायची मानसिकताही हवी ते मागे वळून पहात नसत. ना गर्दीची वाट पहात. प्रसिद्धीची हाव तर कधीच नव्हती. चहाचा मान कार्यकर्त्यांच्या घरी मिळाला की कार्यकर्ता खूश. सर्वधर्मसमभावाचा मान, अशा अवलियाबरोबर आहोत हीच कार्यकर्त्यांची जमेची बाजू. रात्री-अपरात्री फक्त ‘भाईनं आपयल्या’ या शब्दाला ताकद होती. असे हे कार्यकर्ते मुळीच विखुरलेले नाहीत. त्यांच्या तत्त्वाशी ते फक्त तडजोड करायला तयार नाहीत. पर्रीकरांची मनशा त्या शब्दात कार्यकर्त्यांची मान आजही उंचच आहे.

Manohar Parrikar Former Minister of Defence of India
Goa Is One: गोवा सरकारला कसली घाई झालीय?

पर्रीकरांचे कायकर्ते पर्यायाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पणजीत संपूच शकत नाहीत. नवीन नवरीला नटवले की नऊ दिवसांनी तिची ओळख घरात व्हायला लागते. तिचे विचार, आचार, दृष्टिकोन एका वर्तुळात सामावून घेतला जातो. उरलेले बाजूला सरकतात. दुरून डोंगर साजरे म्हणत स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी कलहापासून दूर जाणारा खरा पणजीचा कार्यकर्ता खिशात दमडी नसताना एका विचारसरणीला साथ देतो. लाचारी न पत्करता, निःस्वार्थीपणे काम करत राहातो. मागेपुढे राहण्यापेक्षाही मला नेताच आवडला नाही, उपेक्षित होण्यापेक्षा घरी राहणं पसंत करणारा पणजीचा भाजपाचा कार्यकर्ता दुर्मिळ. कुणी कुणाबरोबर जावे न जावे हे वैयक्तिक स्वातंत्र्य. याचे उत्तर पणजीच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्यापरिने दिले. भाईंची सावली असलेले कार्यकर्ते रेशमाच्या घट्ट विणेसारखे एकसंध राहिले, असेच ते वर्षांनुवर्षे टिकून राहतील, यात वाद नाही. त्यांचे आपापसात संवाद होतात. आठवणींच्या पुरात भळभळून जुन्या जखमांच्या खपल्या निघतात. कोविडसारख्या संकटात भाई असायला हवे होेते. भाईंच्या वेळी आपण कांदे, बटाटे, तेल... कसे बीजेपी ऑफिस खाली बसून देत होतो. त्यांच्या चर्चा होतात. आठवणींच्या उधाण येतं.

कार्यकर्त्यांच्या दुखऱ्या नसा भाईंना माहिती असत. ते कधीच वाद वाढवत नसत किंवा ऊहापोहही करत नसत. फक्त त्यांच्या घरी धावती फेरी मारत कार्यकर्ता फूस व्हायचा रागवायची हिम्मत नव्हती. दुःख ओकायचं मन माेकळं करायचा. परंतु कार्याला सज्ज. आजही उमेदवार उत्तम दिला तर थंडावलेला कार्यकर्ता जोशात, जोमात, धडधडीतपणे वयाचा मुलाहिजा न बाळगता वाटेल तेवढ्या पायऱ्या वर-खाली करून भारतीय जनता पार्टीचा विजय खेचून आणेल. केवळ कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर ही सामना करण्याची ताकद आहे. अंतर्गत प्रवाह पार्टीच्याच बाजूने होणार फक्त योग्य व्यक्ती, उमेदवारी, नेत्याची प्रतीक्षा पणजीकर कार्यकर्ते करत आहेत. पंचवीस वर्षांची परंपरा मांडवीत सोडायला कुठलाही कार्यकर्ता तयार नाही.

Manohar Parrikar Former Minister of Defence of India
Goa Assembly: सरकारला गोवा विकण्याची घाई

कुठलाही कार्यकर्ता स्वतःलाच खंबीरपणे सांगतो माझी गरज आजही पणजीला आहे. मात्र वैराग्य आता संपणार मी नव्या जोमाने पर्रीकर नाव टिकवणार. मी निवृत्त नाही. माझी स्वतःची शंभर मतं अधिक अधिक करतच मी उमेदवार जिंकणार. माझा विस्तार मी घरबसल्या करू शकतो. वेळ पडली तर रस्त्यावर येईन. जुन्याच पोतेर करून वेशीला टांगीण माझा स्वाभिमान कुणीच विकत घेऊ शकत नाही. नाही त्यांची टॅगलाईन होऊ शकत. प्रत्येक कार्यकर्त्याला ‘मी’पणा मतदाराला खेचणार पर्रीकरांच्या भरघोस कामाची पावती देणार परत पर्रीकर नावाचा बुरुज घट्टपणे रोवणार.!!

-नीना नाईक, पणजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com