Cashew Festival Goa 2023: पहिला काजू महोत्सव 15 एप्रिल

काजू उद्योग गोव्याच्या ग्रामीण भागाशी जसा जुळलेला आहे
Cashew Nut Industry
Cashew Nut IndustryDainik Gomantak
Published on
Updated on

Cashew Festival Goa 2023: काजू हा गोव्याचा ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. मोसम सुरू झाला की त्या दिवसातल्या, दुपारच्या वाऱ्याच्या झुळकीसारख्या, काजूच्या कहाण्या अलंकारीत होऊन सळसळत येतात. त्यात काजू 'बिब्यां'च्या प्रथम प्रीतीचा रोमांच असतो.

काजूबिया-काजूगरांचा खरपूस स्वाद असतो, सकाळच्या पारावर, पोटात उतरलेल्या ‘निऱ्याचा’ गारवा असतो, पिकलेल्या काजूफळाच्या चमचमीत भाजीचा खमंगपणाही मध्येच अवतरतो आणि हुर्राक-फेणीच्या सैरभैर कहाण्यांना कसे विसरता येईल?

पण त्याशिवाय झालेच तर या कहाण्यात, काजूच्या झाडाखाली अवचित झोंबीला आलेला लाज-लपला रोमान्सही असतो.

आणि त्याही पलीकडे काजूचे अर्थशास्त्र असते जे अनेकांच्या जीवनाशी आणि राज्याच्याही मिळकतीशी संबंधित असते. काजू उद्योग गोव्याच्या ग्रामीण भागाशी जसा जुळलेला आहे तसाच तो हॉटेल, रेस्टॉरंट्स, पर्यटन, आरोग्य याच्याशीही निगडीत आहे.

अशा या ‘काजू’ला साजरा करणारा महोत्सव यंदा प्रथमच राज्यात आयोजित होत आहे. 15 आणि 16 एप्रिल असे दोन दिवस हा महोत्‍सव कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणार आहे.

या दोन दिवसीय काजू महोत्सवाचा उद्देश, गोव्याचा काजू वारसा लोकांसमोर आणणे आणि काजू उद्योगाच्या वाढीसंबंधाने विमर्ष करणे हा आहे. या महोत्सवात 'काजू'संबधी कार्यशाळा, व्याख्याने, काजू उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, फॅशन-शो, सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन असेल.

Cashew Nut Industry
Ponda Municipality Election 2023: प्रभाग 4 खुला झाल्याने चुरस वाढणार

गोव्यात पिकणारे विविध प्रजातींचे काजू आपल्याला या महोत्सवात पहायला मिळतील व त्यासंबंधाने समजून घेता येईल. स्थानिक हस्तकला, खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादने गोवा हस्तकला महामंडळ आणि स्वयं-सहाय्यता गटामार्फत लावण्यात येणाऱ्या स्टॉलमध्ये असतील.

आणि अर्थातच काजू फेणी बनवण्याची समृध्द परंपरा आणि आपल्या वारशात काजू बजावत असलेली महत्त्वाची भूमिका आपल्याला महोत्सवात समजून घेता येईल.

‘काजू’ हे गोव्याचे राज्य फळ असले तरी काजूसंबंधी अशाप्रकारचा महोत्सव राज्यात प्रथमच आयोजित होत आहे. देशातील काजू पिकवणारी इतर राज्ये फार आधीपासून काजू महोत्सव साजरा करत आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com