Goa Liberation Day: 60 वर्षांतली उच्च शिक्षणाची प्रगती

गोव्यात शिक्षण क्षेत्र दर्जेदार बनवण्यासाठी कै. भाऊसाहेब बांदोडकर, प्रतापसिंह राणे व कै. मनोहर पर्रीकर यांचे भरीव योगदान आहे. आम्ही आशा बाळगूया की गोव्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला गोवा हे शिक्षण क्षेत्रात भारतातील एक चांगले राज्य म्हणून गोव्याची ओळख असेल.
Goa Liberation Day

Goa Liberation Day

Dainik Gomantak

र्तुगिजांच्या जोखडांतून गोवा विमुक्त झाल्यावर (Goa Liberation Day) सर्वप्रथम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर (Dayanand Bandodkar) यांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला. प्रत्येक गावात प्राथमिक शाळा उघडून शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. सुरुवातीला गोव्यात प्राथमिक शाळेत शिकवण्यास शिक्षकवर्ग नव्हता तेव्हा महाराष्ट्र (Maharashtra) व कर्नाटकातून नोकरीसाठी आलेल्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीला विद्यार्थी अकरावीची परीक्षा महाराष्ट्र बोर्डातून देत असत. नंतर 1975 साली ‘गोवा सेकंडरी ॲण्ड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्ड’ स्थापन झाल्याने विद्यार्थ्यांना गोव्यात दहावी व बारावीची परीक्षा देण्याची सोय झाली.

गोवा स्वतंत्र्य (Independence of Goa) झाल्यावर सर्वप्रथम धेंपो व चौगुले या उद्योग समूहांनी उच्चशिक्षणाचा पाया घातला. ‘धेंपे कला व विज्ञान महाविद्यालय, मिरामार’ व ‘चौगुले कला व विज्ञान महाविद्यालय’ या शैक्षणिक संस्थांची स्थापना 1962 साली झाली. 1963 साली ‘सेंट झेवियर कला व विज्ञान महाविद्यालय, म्हापसा’ व ‘निर्मला इन्स्टिट्यूट, आल्तिनो’ यांची स्थापना झाली. ‘कार्मेल कला व विज्ञान महाविद्यालय’ 1964 साली व ‘धेंपो वाणिज्य महाविद्यालय’ 1966 साली स्थापन करण्यात आले.

Goa Liberation Day

...अन्यथा गोवा मुक्तीला झाला असता उशीर!

नंतर हळूहळू नवनवीन महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सुरू झाली. या सर्व शिक्षणसंस्था खाजगी व्यवस्थापन मंडळाने अनुदान तत्त्वावर सुरू केल्या. गोवा सरकारने उच्च शिक्षणात आणखी एक पाऊल टाकताना सहकारी महाविद्यालये स्थापन केली. अशी सरकारी महाविद्यालये साखळी, खांडोळा, केपे, पेडणे व मडगाव-बोर्डा येथे स्थापन करण्यात आली आहेत. साळगावकर उद्योग समूहाने तसेच कारे उद्योग समूहाने कायदा महाविद्यालये सुरू केली आहेत.

गोव्यात उच्च शिक्षणाचा प्रसार चांगल्या प्रकारे झाला व होत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा दंत वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, गृहविज्ञान (होम सायन्स) महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, संगीत महाविद्यालय, कला अकादमी थिएटर कॉलेज, आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय अशा उच्चशिक्षणाच्या संस्था आज गोव्यात आहेत.

गोवा स्वतंत्र झाल्यानंतर सर्व महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न होती; पण, 1984 साली गोवा विद्यापीठाची स्थापना करून आज सुमारे 55 शासकीय व बिगरशासकीय तसेच व्यावसायिक महाविद्यालये संलग्न आहेत. गोव्यात आयआयटी (2016), एनआयटी (2010), हॉटेल मॅनेजमेंट (2002) बिट्‍स पिलानी (2004) व गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (1993) यांची स्थापना झाली. आज गोव्यात सर्व तऱ्हेचे शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध आहे.

अतिशय लहान प्रदेश असून इतकी महाविद्यालये असणे हे गोव्यातील लोकांना अभिमानास्पद आहे. गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांत मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. काही ठिकाणी देणगी देणे बंधनकारक आहे. पण, गोव्यात (Goa) शैक्षणिक संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी देणगी देण्याची अजून तरी आवश्यकता भासत नाही. गरिबातील गरीब विद्यार्थी आज गोव्यात सहजपणे शिक्षण घेऊ शकतो.

Goa Liberation Day

Goa Sex Scandal: जबाबदारी भाजप व काँग्रेसचीही

गोव्यात सर्व प्रकारच्या शिक्षणाची (Eduction) सोय आहे. गरज आहे ती फक्त मन लावून अभ्यास करण्याची. गोव्याचे शहरीकरण व औद्योगिक वसाहती यांमुळे गोव्याबाहेरील लोकांची संख्या वाढत असल्याचे प्रकर्षाने दिसते. गोव्यात बांधकाम क्षेत्रात लागणारा मजूरवर्ग बाहेरील राज्यांतील आहे. कारण, आमच्या गोव्यात शिक्षणामुळे आपले पारंपरिक व्यवसाय व कामे लोक विसरून नोकरी करण्याच्या मागे लागले आहेत.

गोवा विमुक्त झाल्यावर इथे आलेले लोक स्वत:च्या नोकरीमुळे तसेच हा परिसर शांतता व निसर्गसौंदर्याने भरला असल्यामुळे गोव्यातच स्थायिक झाले. आज त्यांची मुले इथे चांगले शिक्षण घेऊन नोकरी मिळवीत आहेत. स्वतंत्र्य होण्यापूर्वी बहुसंख्य लोक अशिक्षित होते. थोड्याफार प्राथमिक शाळा होत्या; पण, सर्वांना शिक्षण घेणे जमत नव्हते. उच्चवर्णीय व काही प्रमाणात श्रीमंत असलेली कुटुंबे शिक्षणाकडे वळत असत. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. स्वतंत्र झाल्यावर बहुजन समाज व इतर मागासवर्गीय लोकांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

तत्पूर्वी गरीब परिस्थिती व शेती व्यवसायामुळे त्यांना जास्त शिक्षण घ्यायला मिळाले नव्हते. पण आज त्यांची मुले उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. शिक्षण समाज बदलू शकतो याचे उदाहरण गोवा राज्य आहे. गोव्याची जी प्रगती झाली आहे ती फक्त शिक्षणव्यवस्थेमुळेच.

गोव्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी स्वत:चे योगदान दिले आहे. गोवा विद्यापीठ स्वत:च्या परीने प्रयत्न करीत आहेत. गोव्यात चांगले शिक्षण जर मिळत असेल तर निश्चितच बाहेरील राज्यांतील विद्यार्थी शिक्षणासाठी गोव्यात येतील. त्यामुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्याची संधी लाभेल.

Goa Liberation Day

Freedom fighter in Goa liberation: शिरूभाऊ लिमये एक मुक्तात्मा

गोव्यात उच्च शिक्षण संस्थांची संख्या वाढत आहे, विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, गुणात्मक दृष्टीने प्रगती होत आहे; पण, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही. आपली शिक्षणपद्धती केवळ पदवीधर बनवतात; पण, त्यांना रोजगार मिळण्याची जी आवश्यकता आहे ती सेवासुविधा शिक्षणसंस्था देऊ शकत नाही. ज्या शिक्षणामुळे रोजगार मिळू शकतो, त्या शिक्षणाची गरज आज आम्हाला आहे. आज गोवा विमुक्त होऊन 60 वर्षे झाली. या साठ वर्षांत गोव्याने शिक्षण क्षेत्रात भरीव प्रगती केलेली आहे. शिक्षणपद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत; पण, निश्चितच चांगल्या प्रकारचे दर्जेदार शिक्षण आज गोव्यात विद्यार्थ्यांना मिळत आहे.

प्रा. डॉ. संतोष पाटकर

60 वर्षांतली उच्च शिक्षणाची प्रगती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com