Blog: चंद्रावर मानवी वस्ती शक्य

‘चंद्रयान-३’ च्या माहितीमुळे तेथे मानवी वस्तीची शक्यता वाढली आहे.
Chandrayaan-3
Chandrayaan-3Dainik Gomantak

डॉ. सुरेश नाईक

नियोजित केल्यानुसार २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता अभूतपूर्व यश संपादन करीत चंद्राच्या दक्षिण भागात ‘चंद्रयान-३’ चा विक्रम लॅंडर हळुवारपणे उतरला. त्यानंतर प्रज्ञान रोव्हरने बाहेर पडत यशस्वीपणे चंद्रावर फेरफटका मारला.

सात सप्टेंबरपर्यंतच्या (चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे १४ दिवस) अवधीत लॅंडर व रोव्हर यांच्यावरील उपकरणांद्वारे त्यांनी महत्त्वाची माहिती पाठवली आहे. चंद्रावर हळूवारपणे लॅंडिंग करणाऱ्या अमेरिका, रशिया व चीन या मोजक्या देशांच्या पंगतीत भारताने मानाचे स्थान मिळविले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट-लॅंडिंग करणारे हे जगातील पहिलेच यान आहे.

‘इस्रो’ने सुरुवातीच्या माहितीपत्रकामधे हे दोन्ही घटक १४ दिवसच कार्यरत राहतील, असे म्हटले होते; परंतु नंतरच्या त्यांच्या सूचनेनुसार त्या दोघां घटकांना चंद्रावरची रात्र सुरू व्हायच्या आधी ‘स्लीप’ मोडमधे ठेवण्यात येईल आणि पुन्हा १४ दिवसानंतर त्यांना ‘जागे’ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जाहीर करण्यात आले.

२२ सप्टेंबर २०२३ च्या सुमारास त्यांना जागृत करणे ‘इस्रो’ला अपेक्षित आहे. जरी ‘आरटीजी’ची सोय या दोन्ही घटकांमधे ‘इस्रो’ने केली नसली तरी (त्याचे तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या समग्रपणे चाचण्या होऊन त्याच्या कार्यक्षमतेबद्दल खात्री करून घ्यायला हवी.

Chandrayaan-3
Nagpur-Margao Railway: खुषखबर! नागपूर-मडगाव रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; गाडीलाही मुदतवाढ

दुसरे म्हणजे त्याचा अतिरिक्त भार वाहून नेण्याची क्षमता रॅाकेटमधे असायला हवी) इतर उपाययोजना ‘इस्रो’ने याबाबतीत केल्या आहेत. त्यामधे उष्णता निर्माण करणारे हीटर, उष्णताविरोधक प्रणाली इत्यादीचा समावेश होतो. त्यामुळे हे दोन्ही घटक जागे होऊन आणखी १४ दिवस काम करतील व त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकेल, अशी आशा आहे. तसे झाले तर ती एक महत्त्वाची घडामोड ठरेल; त्यामुळे

सबंध भारताचे लक्ष पुन्हा एकदा २२ सप्टेंबरला हे दोन्ही घटक पुन्हा एकदा जागे होतील का, याकडे लागले असेल.

‘चंद्रयान-३’ च्या माहितीमुळे तेथे मानवी वस्तीची शक्यता वाढली आहे. ‘चांद्रयान-३’ ने आपल्या कामात काही महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे आणि चंद्राबद्दल दोन प्रमुख निष्कर्ष जाहीर केले आहेत. एक तापमानाशी संबंधित, दुसरे ऑक्सिजनसह अनेक घटकांच्या उपस्थितीशी संबंधित. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, ऑक्सिजन आणि सिलिकॉनच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे.

इस्रोने तरंगलांबीशी संबंधित विविध श्रेणींमध्ये या घटकांची उपस्थिती दर्शविणारा तक्ता जारी केला आहे. हे निष्कर्ष महत्त्वपूर्ण आहेत, याचे कारण ‘चांद्रयान-३’ ला तो शोधत असलेला हायड्रोजन सापडला तर ते चंद्रावरील पाण्याच्या शोधात आणखी एक पाऊल असेल. चंद्राच्या दक्षिण भागात मोठी विवरे आहेत, ज्यांच्या आतमध्ये सूर्याचा प्रकाश कधीच पोचू शकत नाही.

लक्षावधी वर्षांपासून धूमकेतू व लघुग्रह हे चंद्रावर आपटत आले आहेत आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या बर्फामुळे विवरांमधे मोठ्या प्रमाणात बर्फ साठत आले आहे. त्यामुळे मानवी वसाहतीला पाणी, ऑक्सिजन व इंधन प्राप्त होऊ शकेल.

‘चंद्रयान-३’ ने शोधलेल्या खनिजांमधे गंधक किंवा सल्फर हा घटक महत्त्वाचा आहे. चंद्रावर सिलिकॅान हे खनिज उपलब्ध आहे. यालाही ‘चंद्रयान ३’ च्या संशोधनामुळे पुष्टी मिळाली आहे. या दोन्हींचे मिश्रण करून ‘सल्फाईड कॉंक्रिट बनविता येऊ शकेल आणि याचा उपयोग चंद्रावर बांधकामासाठी करण्यात येईल.

‘चंद्रयान-३’च्या लॅंडरने केलेले दुसरे आश्चर्यकारक निरीक्षण म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाखालचे तापमान आणि पृष्ठभावरचे तापमान यामधे असलेला विलक्षण फरक. तापमानात ८० मिमी खोलीवर उणे १० अंश सेल्सिअस, तर जमिनीच्या सुमारे २० मिमी उंचीवर ७० अंश सेल्सिअसपर्यंत इतका मोठा बदल आढळून आला.

याचा निष्कर्ष आपण असा लावू शकतो की, चंद्राच्या मातीमधे (याला रिगॅालिथ म्हणतात) उष्णताविरोधक (इन्सुलेशन) गुणधर्म आहे. याचा वापर भविष्यात चंद्रावरील निवासस्थानाच्या आतील तापमान नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी होऊ शकतो. चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली निवासस्थान केल्याने, आतील स्थिर आणि आरामदायी तापमान राखणे सोपे होते. रहिवाशांचे पृष्ठभागाच्या तापमानातील तीव्र फरकांपासून संरक्षण होते. यामुळे ऊर्जा (इलेक्ट्रिसिटी)स्त्रोतांवरील अवलंबन कमी होऊ शकते.

सारांश, चंद्र रेगोलिथचे थर्मल इन्सुलेटिंग गुणधर्म चंद्रावरील भविष्यातील मानवी निवासस्थानांच्या आराम, सुरक्षितता आणि टिकाऊपणासाठी योगदान देऊ शकतात. हे फायदे चंद्राच्या पृष्ठभागावर शाश्वत उपस्थिती स्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com