G-20 Summit In Goa: G-20 प्रतिनिधींची मने चित्रकारांनी जिंकली

कालिदास आणि स्नेहा या दोघांनी परिषदेच्या ठिकाणी आपली वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती मांडून प्रतिनिधीना त्यासंबंधी माहिती दिली.
Painting
Painting Dainik Gomantak
Published on
Updated on

G-20 Summit In Goa दोनपावला येथील ताज कन्वेंशन सेंटरमध्ये चाललेल्या जी-20 परिषदेच्या अलीकडच्या भागात कालिदास सातार्डेकर आणि स्नेहा वाडकर या चित्रकारांनी आपल्या कलेचे प्रात्यक्षिक परिषदेतील परदेशी प्रतिनिधींसमोर सादर केले.

या दोन्ही कलाकारांची निवड गोवा कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत करण्यात आली होती. परिषदेतील चारही दिवस या दोघां कलाकारांनी परिषदेसाठी हजर असलेल्या प्रतिनिधींना गोमंतकीय प्रतिभेचे प्रातिनिधिक दर्शन घडवले.

कालिदास सातार्डेकर हे जलरंग माध्यमातल्या चित्रकलेसाठी तसेच कॅलिग्राफीसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता लाभली आहे. स्नेहा वाडकरने गेल्याच वर्षी ‘म्यूरल’ हा विषय घेऊन गोवा कॉलेज आॅफ फाईन आर्टमधून आपले ‘मास्टर्स’ पूर्ण केले आहे.

गोव्याचे वैशिष्ट्य असलेला चितारी रंगकलेतही ती काम करत असते. कालिदास आणि स्नेहा या दोघांनी परिषदेच्या ठिकाणी आपली वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती मांडून प्रतिनिधीना त्यासंबंधी माहिती दिली.

Painting
International Widows Day : "गोव्यातील विधवा स्त्रियांची पराकाष्ठेची निष्ठूर प्रथा बंद व्हावी हीच प्रार्थना"

स्नेहा वाडकर ॲक्रिलिक तसेच जलरंगांमधून काम करते. म्यूरल हा तर मास्टर्ससाठी तिचा विशेष विषय होता. ती जरी चितारी समाजापैकी नसली ‘चितारी’ शैलीमधून ती पोस्टर्स बनवत असते.

या परिषदेत तिने या माध्यमातून तयार केलेल्या आपल्या कलाकृती मांडल्याच होत्या पण त्याशिवाय स्वतः तयार केलेल्या काही हस्तकला वस्तूंचेही प्रदर्शन केले होते. तिच्या कलाकृतींना देखील प्रतिनिधींकडून चांगला प्रतिसाद लाभला. तिच्या काही कलाकृती प्रतिनिधींनी विकतही घेतल्या.

Painting
Dashavatar Artist : दशावतारासाठी वेचले आयुष्य

कालिदास यांनी रंगवलेली चित्रे (पोर्ट्रेट्‍स) पाहून परदेशी प्रतिनिधी विस्मयीत झाले होते. ‘इंन्क्रेडिबल इंडिया’या संकेतस्थळाने तर त्याच्या कॅलिग्राफीक कलाकृती तत्परतेने आपल्या स्थळासाठी घेतल्या. अनेक प्रतिनिधीनी त्याच्याकडून कॅलिग्राफीचे नमुने तयार करून घेतले.

ते जरी त्यांची किंमत चुकवायला तयार होते तर कालिदासने आपल्या या कलाकृती त्यांना भेट म्हणून दिल्या. त्याच्या जलरंगांमधील कलाकृतींसाठीही प्रतिनिधींकडून विचारणा करण्यात आली होती, पण ही चित्रे विकण्याचा कालिदासचा हेतू नव्हता.

जलरंगांमधून वास्तववादी शैलीने रंगवलेल्या कालिदास यांच्या कलाकृतीकडे पाहून त्यांचा विश्वास बसत नव्हता की एक स्थानिक कलाकार अशी चित्रे रंगवू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com