Bird
Bird Dainik Gomantak

Blog: घर थकलेले संन्यासी

झाडांनी आपली पालवी गमावल्यानंतर सडेफटिंग झालेले हे पक्षी आपली पथारी तिथे अजून काय म्हणून पसरून आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही.
Published on

Bird पणजीहून मडगांवच्या दिशेने जाताना, पणजी बसस्टॅण्डवरुन सुमारे अडिच किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला, वाळून गेलेल्या खारफुटीचे जराजर्जर बन दिसते.

एक विशिष्ट भाग नेमकेपणे आखून त्यामधल्या झाडांचे हिरवेपण कुणीतरी कारस्थानाने खुडून टाकले आहे हे कळायला फारसा उशीर लागत नाही. ती शुष्क झाडे, खालचे काळवंडलेले हिरवे पाणी अशा त्या ठप्प मरणांतिक देखाव्याला, काही पक्ष्यांच्या तिथल्या हालचालींनी मात्र थोडीशी जिवंत धुगधुगी आल्यासारखी होते.

कदाचित  हे पक्षी तिथले पूर्वीपासूनचे रहिवासी असू शकतात. उजाड होत जाणारे आपले हे घर कदाचित त्यांना सोडवत नसावे.

झाडांनी आपली पालवी गमावल्यानंतर सडेफटिंग झालेले हे पक्षी आपली पथारी तिथे अजून काय म्हणून पसरून आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही. संध्याकाळ झाली की ही जागा त्यांच्या पंखांच्या फडफडाटाने अधिकच भळभळल्यासारखी होते.

Bird
Hindu Convention at Ponda : देशातील एक हजार मंदिरात वस्त्रसंहिता ते हिंदू राष्ट्राची घोषणा; गोव्यातील हिंदू अधिवेशनातील 7 ठराव

करकोचे, बगळे, घारी आदी पक्ष्यांचे दर्शन या सुकलेल्या खारफुटीच्या बनात अजूनही नियमितपणे होते. आपले अन्न मिळवण्यासाठी खालच्या गढूळलेल्या हिरवट पाण्यात यापैकी काही पक्षी आपली चोच बुडवताना दिसत असतात. वाळलेल्या फांद्यांच्या बेचक्यात काही पक्ष्यांची घरटी अजूनही तग धरून आहेत.

Bird
Seafarers Pension Scheme: 'खलाशी पेन्शन' बाबत गोवन सिफेरर्स असोसिएशने केलीय 'ही' मागणी

या खारफुटीच्या बनाची ही दशा अशी का झाली याचा शोध घ्यायचा गंभीर प्रयत्न मात्र होताना दिसत नाही.  तिथल्या उरलेल्या खारफुटीचे भविष्यही टांगणीला लागलेले आहे. मध्यंतरी वनमंत्र्यांनी तिथे स्वतः येऊन पाहणी केली होती.

मात्र या प्रकरणाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न त्यांनी कशाप्रकारे केला हे कळायला मार्ग नाही. खारफुटी ही भूमीच्या संरक्षणाची ढाल आहे. पूर, तुफानांना झेलून घेऊन ही झाडे आपल्या आसपासच्या प्रदेशांचे रक्षण करतात. 

पण सध्यातरी त्यांच्या आणि त्यांच्यात वसलेल्या जीवांच्या रक्षणाचा प्रश्न गंभीरपणे उभा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com