International Tour: बापरे! 'या' देशांमध्ये भारतीय करतात सर्वाधिक प्रवास, खर्च ऐकून तुम्हालाही...

Reserve Bank of India: परदेश दौऱ्यावर भारतीय दर महिन्याला एक अब्ज डॉलर्स खर्च करत आहेत. हा आकडा कोविड महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे.
Citizens
Citizens Dainik Gomantak
Published on
Updated on

RBI: परदेश दौऱ्यावर भारतीय दर महिन्याला एक अब्ज डॉलर्स खर्च करत आहेत. हा आकडा कोविड महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे. भारतीयांनी प्रवासासाठी रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एप्रिल-डिसेंबर दरम्यान $9.95 अब्ज पाठवले.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, 2021-22 च्या याच कालावधीत हा खर्च $4.16 अब्ज होता. कोविड महामारीपूर्वी, 2019-20 च्या याच कालावधीत हा आकडा $5.4 अब्ज होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये यावर सात अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले.

Citizens
RBI चा मोठा निर्णय, आता 'या' 20 देशांतील प्रवासी घेऊ शकणार UPI पेमेंटचा लाभ

V3Online चे पार्टनर सपन गुप्ता म्हणाले की, “भारतीय त्यांच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह जगभरात प्रवास करत आहेत. व्हिएतनाम, थायलंड, युरोप (Europe) आणि बाली ही काही प्रमुख ठिकाणे भारतीयांची पसंती आहेत.'' याशिवाय युरोप, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि दुबई या देशांचाही भारतीयांच्या पसंतीत समावेश आहे, असेही ते म्हणाले.

सॅनकॅशचे सह-संस्थापक आकाश दहिया म्हणाले की, परवडणारा प्रवास आणि तांत्रिक प्रगतीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास वाढत आहे. “आमच्या पोर्टफोलिओमधील 75 टक्के लोक आता आंतरराष्ट्रीय प्रवासाची निवड करत आहेत. युरोप, बाली, व्हिएतनाम आणि दुबईसारख्या ठिकाणांसाठी भारतीयांमध्ये मागणी वाढत आहे.

Citizens
RBI Monetary Policy: कर्जदारांना दिलासा नाहीच! हफ्ता आणखी वाढणार; RBI चे पतधोरण जाहीर

दुसरीकडे, सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षापासून परदेश टूर पॅकेजवरील टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (TCS) दर विद्यमान पाच टक्क्यांवरुन 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे भारतीयांच्या परदेश प्रवासावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com