कशी काम करणार शेअर्सचे सेटलमेंटची T+1 प्रणाली

मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे.
How T+1 system of settlement of shares will work
How T+1 system of settlement of shares will work Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख स्टॉक एक्स्चेंज आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 प्रणाली जाहीर केली. सर्व एक्सचेंजेस आणि संस्थांनी सांगितले की त्यांनी शेअर्स सेटलमेंटच्या T+1 प्रणालीसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम 25 फेब्रुवारी 2022 पासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल.

गुंतवणूकदारांना काय फायदे होतील

T+1 मध्ये T म्हणजे "ट्रेडिंगचा दिवस". T+1 प्रणाली लागू केल्यामुळे, शेअर्स विकल्यानंतर एक दिवस गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतील. सध्या, शेअर्सच्या सेटलमेंटसाठी T+2 प्रणाली लागू आहे. म्हणजेच शेअर्सची विक्री किंवा ट्रेडिंग केल्यानंतर दोन दिवसांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे येतात. T + 1 प्रणाली लागू केल्यानंतर, गुंतवणूकदारांनी शेअर्स विकल्यास एक दिवस आधी पैसे मिळतील.

How T+1 system of settlement of shares will work
देशातील सर्वात मोठा Paytm IPO आज उघडणार! तुम्ही पैसे गुंतवावे का?

ही प्रणाली खालच्या 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये लागू केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. T + 1 प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल, जी 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात, बाजार भांडवलानुसार, ही प्रणाली सर्वात कमी 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये लागू होईल. त्यानंतर मार्च 2022 पासून या प्रणालीमध्ये आणखी 500 स्टॉक आणले जातील. सर्व मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी (MII) एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या MII मध्ये स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज समाविष्ट आहेत.

How T+1 system of settlement of shares will work
नोटबंदी यशस्वीच! डिजीटायजेशन, परकीय गुंतवणीकत मोठी वाढ

सेबीची परवानगी

यापूर्वी, बाजार नियामक SEBI ने एक्स्चेंजना इक्विटी विभागामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही सिक्युरिटीजसह 1 जानेवारी 2022 पासून T+1 प्रणाली लागू करण्याची परवानगी दिली होती. संयुक्त निवेदनानुसार, स्टॉक एक्स्चेंज (BSE, NSE आणि MSEI) वरील सर्व सूचीबद्ध समभागांना घटत्या मार्केट कॅपनुसार क्रमवारी लावली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com