स्क्वेअर पापड की गोल पापड कशावर आकारला जाणार GST? CBIC दिले स्पष्टीकरण

GST पापड प्रकरणावरून सोशल मीडियावर (Social Media) चर्चा
Papad GST
Papad GSTDainik Gomantak

उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांच्या ट्विटवर सीबीआयसीने (CBIC) स्पष्टीकरण दिले आहे, ज्यांनी अशी माहिती दिली की वस्तू आणि सेवा कर (GST) स्क्वेअर पापडवर (papad) आकारला जाणार गोल पापडवर नाही. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर (Social Media) बरीच खळबल उडाली होती.

हर्ष गोएंका ट्विट

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये, "तुम्हाला माहित आहे का की गोल पापडला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे, तर स्क्वेअर पापडवर जीएसटी आकारला जाणार आहे. कोणी चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटचे नाव सुचवू शकेल का जेणेकरून तो मला यामागील तर्क समजावून सांगू शकेल?" असे लिहिले होते.

CBIC ने हे उत्तर दिले

हर्ष गोयनका यांच्या ट्विटला उत्तर देताना, सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (सीबीआयसी) यांनी स्पष्टीकरण दिले, "जीएसटी अधिसूचना क्रमांक 2/2017-सीटी (आर) द्वारे सर्व प्रकारच्या पापडाला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. ही सूचना http://cbic.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे." असे CBICने ट्विटमध्ये लिहिले आहे.

अनेक युजर्सनी ते बनावट असल्याचे सांगितले

हर्ष गोयनका यांच्या ट्विटनंतर काही वापरकर्त्यांनी हे ट्विट असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी, गुजरातच्या अ‍ॅथॉर्सी ऑफ अ‍ॅडव्हान्स रुलींग्सनेही ​​(GAAR) आपल्या एका आदेशात स्पष्ट केले होते की कोणत्याही प्रकार आणि आकाराच्या पापडांवर कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही.

महाराष्ट्राच्या AAGR ने दिला आदेश

अलीकडेच, गुजरातच्या जीएसटी अथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलींग्ज (AAR-Gujarat) कडून लस्सी आणि दुधावरील जीएसटीबाबत एक आदेश काढला आहे. दरम्यान एक मनोरंजक किस्सा समोर आला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृह फीवर जीएसटी लागणार की नाही. या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या AAGR ने आदेश दिला होता की, जर एका दिवसाचे भाडे 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर कोणतेही हॉटेल, Inn, अतिथीगृह, क्लब किंवा campsite GST मधून मुक्त करण्याल आले आहे. हाच नियम वसतिगृहातील खोल्यांनाही लागू करण्यात यावा, असे AAGRने आदेशात म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com