Bank Holiday : शनिवारपासून सलग 4 दिवस बँका असून शकतात बंद

सलग 4 दिवस बँका बंद असल्याने बँक सेवांवरही परिणाम
Bank Holiday
Bank HolidayDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : आपल्याकडे अशी काही लोक आहेत जी अजूनही बँकेत जाऊनच आपली कामे पार पाडतात. मात्र अशा लोकांना आता मानसिक त्रासाला समोर जावे लागणार आहे. कारण शनिवारपासून सलग 4 दिवस बँका बंद असण्याची शक्यता आहे. 26 मार्चला महिन्याचा चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार असल्याने बँकांना सलग दोन सुट्टी असेल. तर 28-29 मार्च रोजी विविध कर्मचारी संघटनांनी दोन दिवसीय संप पुकारला असल्याने बँका ही बंद असू शकतात. (Bank's closed for 4 days)

सलग 4 दिवस बँका (Bank) बंद असल्याने बँक सेवांवरही परिणाम होऊ शकतो. एटीएम रिकामे राहू शकतात. एसबीआय (SBI) नुसार, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने माहिती दिली आहे की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) यांनी संपावर (Strike) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा संप सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण आणि बँक कायदा दुरुस्ती विधेयक 2021 च्या निषेधार्थ पुकारला आहे.

Bank Holiday
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा

दरम्यान गेल्याच महिन्यात ऑल इंडिया रिजनल रुरल बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (AIRRBEA) केंद्र सरकारला संपाची नोटीस पाठवली असल्याने ग्रामीण बँकांनीही संपात सहभागी होणार आहेत. तर हा संप केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारला असून देशातील 11 कामगार संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे. रस्ते, वाहतूक, ऊर्जा क्षेत्र, बँका आणि विमा यासह आर्थिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या कामगार, शेतकरी आणि लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com