Bank Holidays in August 2021: ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बॅंका बंद

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद (Bank Holidays) असतात.
Bank Holidays in August 2021
Bank Holidays in August 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

Bank Holidays in August 2021: ऑगस्ट महिना सुरू होण्यास आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये बँका 15 दिवस म्हणजेच पुर्ण अर्ध्या महिन्यासाठी बंद असणार आहे. अशा परिस्थितीत बँकांशी संबंधित आपले काम वेळेवर करून घेणे फायद्याचे आहेत. केंद्रीय बँक आरबीआयने निश्चित केलेल्या काही सुट्ट्या प्रादेशिक असल्याने देशभरातील सर्व बँका 15 दिवस बंद राहणार नाहीत. कारण काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील आणि काही राज्यातील बँका खुल्या राहतील. तर काही ठिकाणच्या बॅंक सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. (Bank Holidays list in August 2021)

Bank Holidays in August 2021
TAX Collection: केंद्र सरकारचे यंदा 22.2 लाख कोटींचे लक्ष

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. मात्र आता ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बँकेला सुट्ट्या मिळणार आहेत, त्यासोबतच कोणत्या राज्यात बँका बंद राहतील आणि कोणत्या दिवशी खुल्या राहतील याचीही माहिती देण्यात आली आहे. या माहीतीच्या आधारावर, आपल्या बँकेशी संबंधित कामं आपण निकाली काढू शकता. जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट महिन्यात कोणतीही बॅंकेशी संबधीत आर्थिक अडचण उद्भवणार नाही. आणि आपल्या कोणत्याही कामात व्यत्यय येणार नाही.

ऑगस्ट 2021 मध्ये या दिवशी राहणार बँकेला सुट्टी

  • 1 ऑगस्ट - रविवार

  • 8 ऑगस्ट - रविवार

  • 13 ऑगस्ट - पैट्रियट टे- इंफाळमध्ये बँक बंद

  • 14 ऑगस्ट - महिन्याचा दुसरा शनिवार

  • 15 ऑगस्ट - रविवार

  • 16 ऑगस्ट - पारसी नववर्ष - बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद

  • 19 ऑगस्ट - मोहरम- अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद

  • 20 ऑगस्ट - मोहरम / फर्ट्स ओणम - बेंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद

  • 21 ऑगस्ट- थिरुवोणम - कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

  • 22 ऑगस्ट - रविवार

  • 23 ऑगस्ट - श्री नारायण गुरु जयंती - कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद

  • 28 ऑगस्ट - महिन्याचा चौथा शनिवार

  • 29 ऑगस्ट - रविवार

  • 30 ऑगस्ट - कृष्ण जन्माष्टमी- अहमदाबाद, चंडीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पटना, रायपूर, रांची, शिलांग, शिमला आणि श्रीनगर येथे बँका बंद

  • 31 ऑगस्ट - श्रीकृष्ण अष्टमी - हैदराबादमध्ये बँक बंद

Bank Holidays in August 2021
TAX Collection: केंद्र सरकारचे यंदा 22.2 लाख कोटींचे लक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com