Zomatoला 359 कोटी रुपयांचा फटका, खर्च वाढला, कमाई मात्र घटली

झोमॅटो (Zomato) कंपनीच्या उत्पन्नापेक्षा खर्चात अधिक वाढ झाल्याने तोटा (Loss) झाला आहे असे स्पष्ट केले आहे.
Zomato was hit by Rs 359 crore, expenses increased, but revenue declined
Zomato was hit by Rs 359 crore, expenses increased, but revenue declinedDainik Gomantak
Published on
Updated on

पहिल्या तिमाहीत ऑनलाइन (Online) फूड डिलीव्हरी कंपनी (Food delivery company) असलेल्या झोमॅटोला (Zomato) 359 कोटी रुपयांचा तोटा (Loss) झाल्याचे समोर आले आहे. या कंपनीला मागील वर्षात 99.8 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. झोमॅटो (Zomato) कंपनीच्या उत्पन्नापेक्षा खर्चात अधिक वाढ झाल्याने तोटा झाला आहे असे स्पष्ट केले आहे. मागील महिन्यात झोमॅटोने शेअर मार्केटमध्ये (Stock market) आपला IPO आणला होता.

Zomato was hit by Rs 359 crore, expenses increased, but revenue declined
ATM मध्ये कॅश नसल्यास बँकेला पडणार मोठा दंड

झोमॅटो (Zomato) कंपनीने Employee Stock Ownership Plan (ESOP) ही स्कीम मार्केटमध्ये आणल्यानंतर यावर जास्त प्रमाणात खर्च झाला आहे. यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे असं झोमॅटोने निवेदनात स्पष्ट केले आहे.

Zomato was hit by Rs 359 crore, expenses increased, but revenue declined
लॉकडाऊन काळातही देशात 136 लोकांची संपत्ती 100 कोटी पार

कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, झोमॅटोला (Zomato) या तिमाहीत 844.4 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. परंतु या तिमाहीत कंपनीच्या खर्चात 1259.7 कोटी रुपयांची वाढ होऊन तोटा झाला आहे. तसेच गेल्या वर्षी हा महसूल 266 कोटी रुपये एवढा होता.

Zomato was hit by Rs 359 crore, expenses increased, but revenue declined
नवीन पेन्शनधारकांनाही मिळू शकते जुनी पेन्शन; जाणून घ्या अट

झोमॅटो कंपनीच्या (Zomato) महसुलात 96 टक्क्यांची वृद्धी झाली होती. 2019 साली झोमॅटोचा महसूल हा 1398 कोटी रुपये इतका होता. मागील वर्षी म्हणजेच 2020 साली त्यामध्ये वाढ झाली असून तो 2743 कोटी रुपये एवढा झाला. मागील वर्षी झोमॅटोला 403 मिलियन ऑनलाइनद्वारे ऑर्डर्स मिळालेल्या होत्या. त्याचा आकडेवारीत हिशोब केला तर 11,221 कोटी एवढा आहे. गेल्या वर्षी झोमॅटो कंपनीने दोन लाख डिलीव्हरी पार्टनर्सद्वारे भारतात 500 शहरांत फूड डिलिव्हरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com