Zomato Co-Founder Mohit Gupta Resigns: झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी साडेचार वर्षांच्या कारकिर्दीनंतर कंपनी सोडली आहे. तसेच, इंटरसिटी लीजेंड्स सेवेचे प्रमुख सिद्धार्थ झवर यांनी एक आठवडा आधी कंपनी सोडल्याची घोषणा केली होती. फूड डिलिव्हरी कंपनीनधून अलिकडच्या काळात बाहेर पडलेले हे तीसरे पदाधिकारी आहेत. मात्र, मोहित गुप्ता यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Zomato ने सांगितले की, 'सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.' ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ घाटा 250.8 कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे वृत्त दिल्यानंतर काही दिवसांनी ही बातमी आली आहे.
विशेष म्हणजे, कंपनी देशभरातील 150 हून अधिक शहरांमध्ये अन्न वितरण सेवा प्रदान करते. त्याच्या डिलिव्हरी फ्लीटमध्ये शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी 1.5 लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आहेत.
'मुख्य व्यवस्थापकीय पद नव्हते'
कंपनीने सांगितले की, मोहित गुप्ता यांनी झोमॅटोमधून स्वतःच्या इच्छेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी कायदा 2013 अंतर्गत झोमॅटोमधील मुख्य व्यवस्थापकीय पदावरही ते नव्हते. मोहित गुप्ता यांच्या आधी 2021 मध्ये कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक गौरव गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. ते झोमॅटोमध्ये पुरवठा प्रमुख होते. मोहित आणि गौरव गुप्ता यांनी दीपंदर गोयल यांच्यासोबत मिळून Zomato सुरु केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.