युवीने खरेदी केली नवीन BMW X7 SUV, जाणून घ्या कारची किंमत अन् फीचर्स

माजी भारतीय क्रिकेटपटू जर्मन ब्रँड बीएमडब्ल्यूचा चाहता आहे आणि त्याच्याकडे या ब्रॅंन्डची अनेक वाहने आहेत.
Yuvraj Singh bought new BMW X7 SUV
Yuvraj Singh bought new BMW X7 SUV Twitter/@BMWKrishnaAuto
Published on
Updated on

BMW X7: अनेक भारतीय क्रिकेटपटू महागड्या कारचे शौकीन आहे, त्यात पहिले नाव येते भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे. पण त्याच्याशिवाय भारतीय क्रिकेटचा सिक्सर किंग आणि डावखुरा फलंदाज युवराज सिंगही अशा क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू जर्मन ब्रँड बीएमडब्ल्यूचा चाहता आहे आणि त्याच्याकडे या ब्रॅंन्डची अनेक वाहने आहेत. कारवरील प्रेम व्यक्त करत, माजी भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच BMW X7 लक्झरी SUV खरेदी केली. या लक्झरी कार 6-सीटर एसयूव्हीची किंमत रु. 1.17 कोटी आहे आणि ती तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Yuvraj Singh bought new BMW X7 SUV
Ola Electric Car: येत आहे ओला कंपनीची ई-कार ,15 ऑगस्टला होणार लॉचिंग

लक्झरी एसयूव्ही ब्लॅक सॅफायर, मिनरल व्हाईट, टेरा ब्राउन, फायटोनिक ब्लू आणि ब्रिलायन्स इफेक्टसह आर्क्टिक ग्रे यासह अनेक रंगांमध्ये विकली जाते. माजी भारतीय फलंदाजाने ती फायटोनिक ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेतली आहे. या कारचा लूक बघून एसयूव्हीच्या सर्वात महाग व्हेरिएंटची निवड युवीने केली आहे, जिचा एसयूव्हीच्या इतर ट्रिमपेक्षा अधिक स्पोर्टी लूक आहे.

SUV उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी भरलेली आहे आणि तिला लेदर अपहोल्स्ट्रीसह प्रीमियम केबिन आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, SUV ला हेड-अप-डिस्प्ले (HUD) सह मोठा 12.3-इंचाचा इन्स्ट्रुमेंट पॅनल दिला गेला आहे. याशिवाय, दुसरी 12.3-इंच स्क्रीन आहे, जी कारची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

BMW X7 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये जेस्चर कंट्रोल्स उपलब्ध आहेत. व्हॉल्यूम कंट्रोल आणि इतर कार्यक्षमता यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी, तुम्हाला फक्त एक कमांड देणे गरजेचे आहे. तुम्हाला लेन मॉनिटरिंग, सेल्फ-लेव्हलिंग अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन, अॅम्बियंट लाइटिंग, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम आणि बरेच काही फिचर्स मिळते.

Yuvraj Singh bought new BMW X7 SUV
SBI Loss: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक पहिल्या तिमाहीत तोट्यात, एवढा घटला नफा

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, BMW X7 मध्ये ट्विन-टर्बोचार्ज्ड 3.0-लिटर, सहा-सिलेंडर इंजिन आहे जे 335 bhp ची कमाल पॉवर आणि 450 Nm चे पीक टॉर्क निर्माण करते. इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे जे SUV च्या सर्व चार चाकांना शक्ती देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com