Good News ! आता पोस्ट ऑफिसमध्येही करु शकता पासपोर्ट साठी अर्ज

पासपोर्टसाठी (Passport) अर्ज करण्याबाबत तुमचाही संभ्रम असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही.
 Passport
PassportDainik Gomantak
Published on
Updated on

परदेशात जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पासपोर्ट आवश्यक असतो. साधारणपणे असे मानले जाते की, पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया किचकट असते. अनेक वेळा पासपोर्ट कोणत्या ठिकाणाहून आणि कसा मिळवावा हे लोकांना समजत नाही. पासपोर्टसाठी (Passport) अर्ज करण्याबाबत तुमचाही संभ्रम असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी खूप उपयुक्त बातमी घेऊन आलो आहोत. पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) जाऊनही तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करु शकता. (You can also apply for a passport at the post office)

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये याप्रमाणे अर्ज करु शकता-

तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देऊन पासपोर्टसाठी अर्ज करु शकता. परंतु, जर पासपोर्ट सेवा केंद्र तुमच्या घरापासून खूप दूर असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येही तुम्ही हे काम करु शकता. पोस्ट ऑफिसने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा सुरु केली आहे. सध्या देशातील 424 पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. इथे कोणीही पासपोर्टसाठी अर्ज करु शकतो. अधिकाधिक लोकांना सहज पासपोर्ट बनवता यावा यासाठी ही सुविधा परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) सुरु केली आहे. पासपोर्ट बनवण्याच्या अर्जाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता.

 Passport
रेडमीची खास ऑफर, 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन 11,000 हजारात

पासपोर्ट बनवण्यासाठी ऑनलाइनही अर्ज करता येतो-

पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तुम्हाला पासपोर्ट अर्जासाठी ऑनलाइन सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन पासपोर्टसाठी अर्ज भरावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया त्या प्रक्रियेबद्दल-

  • पासपोर्ट मिळविण्यासाठी, सर्वप्रथम पासपोर्टिनडिया. gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. वर क्लिक करा

  • जर तुम्ही पूर्वीचे वापरकर्ते असाल तर, यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लगेच लॉग इन करा.

  • जर तुम्ही आधीचं नोंदणीकृत नसाल तर प्रथम स्वतःची नोंदणी करा.

  • यासाठी प्रथम New User वर क्लिक करा आणि Register Now चा पर्याय निवडा.

  • यानंतर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करुन कॅप्चा कोड टाका.

  • त्यानंतर स्वतःची नोंदणी करा.

  • त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला जवळच्या पासपोर्ट ऑफिसचे तपशील, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि लॉगिन आयडी यासारखे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.

  • त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेवा हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुम्हाला इतर माहिती विचारली जाईल. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे तुमचा फॉर्म नाकारला जाऊ शकतो.

  • त्यानंतर हा फॉर्म सबमिट करा.

  • आता तुम्हाला पासपोर्ट ऑफिससाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.

  • यासाठी आधी पासपोर्ट अर्जाची फी भरावी लागेल आणि नंतर त्याची स्लिप काढून ठेवावी लागेल.

  • यानंतर, अपॉइंटमेंटच्या दिवशी स्लिप पासपोर्ट कार्यालयात घेल्यानंतर तिथे सर्व माहितीची पडताळणी केली जाईल.

  • त्यानंतर पोलीस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

  • अखेर, तुमचा पासपोर्ट भारतीय पोस्टद्वारे 15 दिवसांत तुमच्या घरी पोहोचेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com