Bajaj CNG Bike: बजाजने दाखवली पहिल्या CNG बाईकची झलक; नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलैला होणार लाँच!

Bajaj CNG Bike Teaser Out: देशातील आघाडीची टू-व्हीलर कंपनी बजाज ऑटोने भारतातील पहिल्या सीएनजी बाईकचा टीझर लाँच केला आहे.
Bajaj CNG Bike: बजाजने दाखवली पहिल्या CNG बाईकची झलक; नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलैला होणार लाँच!
Bajaj CNG Bike Teaser OutDainik Gomantak

देशातील आघाडीची टू-व्हीलर कंपनी बजाज ऑटोने देशातील पहिल्या सीएनजी बाईकचा टीझर लाँच केला आहे. या नव्या बाईकचे नाव 'ब्रुझर' असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये येईल. ज्या ग्राहकांना जास्त मायलेज हवे आहे त्यांना लक्षात घेऊन ही खास बाईक तयार करण्यात आली आहे. पण ही खरचं व्ह्यॅल्यू बाईक सिद्ध होईल का, हा प्रश्न आहे. चला तर मग या बाईकविषयी जाणून घेऊया...

5 जुलै रोजी लाँच होणार?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते 5 जुलै रोजी बजाज ऑटोची नवीन CNG बाईक लाँच होणार आहे. कंपनीने याचा टीझरही लाँच केला आहे. टीझरमध्ये बाईकची थोडीशी झलक पाहायला मिळू शकते, परंतु इमेज फारशी स्पष्ट दिसत नाही. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, CNG बाईकचा स्विच उजव्या बाजूच्या हँडल बारमध्ये दिसेल. या स्विचच्या मदतीने बाईकला इंधन आणि सीएनजी मोडमध्ये सहज बदलता येते. हे फिचर्स खरोखरच शानदार आहेत.

Bajaj CNG Bike: बजाजने दाखवली पहिल्या CNG बाईकची झलक; नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलैला होणार लाँच!
Bajaj CNG Bike: पेट्रोलचा खर्च होणार निम्म्याने कमी; 'सीएनजी' बाईक लाँच करणार बजाज?

क्लासिक लुक

टीझरनुसार, या बजाज सीएनजीची डिझाइन अगदी सिंपल असेल, गोल हेडलाइट्स असतील. बाईकला थोडा प्रीमियम टच मिळेल. विशेष म्हणजे, बाईकला लवकरच ग्राउंड क्लिअरन्स मिळणार आहे.

Bajaj CNG Bike: बजाजने दाखवली पहिल्या CNG बाईकची झलक; नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलैला होणार लाँच!
Bajaj CT 125X: बजाजची 125 सीसी सर्वात स्वस्त बाईक लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

बाईक चालवताना पॉवर आणि मायलेजचा समतोल राखण्यासाठी 125cc इंजिनमध्ये ही बाईक लाँच केली जाऊ शकते अशी शक्यता आहे. टीझर व्यतिरिक्त, अद्यापपर्यंत बजाजकडून नवीन सीएनजी बाईकबाबत कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही. पण सूत्रानुसार, ही बाईक 90,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली जाऊ शकते. या बाईकमध्ये 3 ते 5 लिटरचा CNG सिलेंडर मिळू शकतो, जो त्याच्या सीटखाली असेल. पण सूत्रानुसार, बाईक एक किलो सीएनजीमध्ये 90 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com