जगातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीचा भारतीय बाजारपेठेला रामराम

होल्सीम ग्रुप त्यांच्या दोन्ही कंपन्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड विकणार आहे.
Cement Market
Cement Market Dainik Gomantak
Published on
Updated on

जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपने (Holcim Group) भारतातून आपला 17 वर्ष जुना व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. कंपनीने मुख्य बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागतिक धोरण तयार केले आहे. (worlds biggest cement company to exit Indian market)

Cement Market
ग्राहक, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा! कापसावरील कस्टम ड्युटीबाबत सरकारचा मोठा निर्णय

भारतीय बाजारातून बाहेर पडणे हा या धोरणाचा भाग आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होल्सीम ग्रुप त्यांच्या दोन्ही कंपन्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड विकणार आहे.

माहिती समोर येत आहे की, होल्सीम समूह JSW आणि अदानी (Adani) समूहासह इतर कंपन्यांशी (Company) आपला भारतीय व्यवसाय विकण्यासाठी बोलणी करत आहे. जेएसडब्ल्यू आणि अदानी ग्रुप या दोन्ही कंपन्यांनी अलीकडेच सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला आहे. दोन्ही गटांनी सिमेंट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आक्रमक योजना आखल्या आहेत. संभाव्य विक्रीबाबत श्री सिमेंटसारख्या स्थानिक कंपन्यांशीही संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Cement Market
वर्षातील सर्वात मोठी सुट्टी, आजपासून शेअर बाजार 4 दिवस बंद

होल्सीमची भारतीय बाजारपेठेतील प्रमुख कंपनी अंबुजा सिमेंट आहे. होल्सीम 2018 पासून दोन ब्रँड विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com