काम झालं सोप्प! e-wallet च्या मदतीने काढा ATM मधून पैसे

तुम्हाला रोख रक्कम हवी असेल तर तुम्ही एटीएममधून डेबिट किंवा एटीएम कार्डद्वारे पैसे काढता.
e-wallet
e-wallet Dainik Gomantak
Published on
Updated on

तुम्हाला रोख (Cash) रक्कम हवी असेल तर तुम्ही एटीएममधून (ATM) डेबिट किंवा एटीएम कार्डद्वारे (Debit-Credit Card) पैसे काढता. कामाच्या वेळी अनेकदा कार्ड घरी विसरल्यास आपली अडचण होते. अलीकडच्या काळात, UPI द्वारे डिजिटल आणि ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) देशामध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. (Withdraw money from ATM with the help of e wallet)

e-wallet
जिओने दिला मोठा झटका! या प्लॅनसाठी यूजर्संना द्यावे लागणार अधिक पैसे

मात्र, आज अनेकांचा रोख व्यवहारांवरती जास्त विश्वास आहे. अशा लोकांना लक्षात घेऊन खास सुविधा सुरू करण्यात येत आहे. आता कोणीही ई-वॉलेटद्वारे एटीएममधून सहजरित्या पैसे काढू शकणार आहे. पेमेंट सोल्यूशन प्रोव्हायडर OmniCard ने ई-वॉलेटद्वारे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

पेमेंट सोल्युशन्स प्रदाता Omnicard ने सांगितले की त्यांनी ई-वॉलेटद्वारे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली. कंपनीने सांगितले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) परवाना मिळवणारे ते पहिले PPI (प्रीपेड इन्स्ट्रुमेंट) बनले आहे. यातून ग्राहकांना रुपे कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देत आहे.

Omnicard सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पांडे म्हणाले की, ते वापरकर्त्यांना पर्यायी प्लॅटफॉर्मची सुविधा देत आहेत. यासोबतच ग्राहक आपली बँक खाती सुरक्षित ठेवू शकतात. तसेच वापरकर्ते रुपे कार्ड किंवा UPI शी लिंक केलेले डिजिटल वॉलेट देखील वापरू शकणार आहेत. Omnicard हे मोबाइल अॅपसह RuPay सुविधांनी सज्ज प्रीपेड कार्ड असणार आहे.

e-wallet
गौतम अदानींची मोठी डील: फ्रेंच ऊर्जा कंपनी करणार अदानी समूहात गुंतवणूक

एटीएम फसवणुकीची कोणतीही घटना घडणार नाही,

Omnicard ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकणार आहेत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले. कार्ड चोरी किंवा कार्ड क्लोन यासारख्या होण्याऱ्या फसवणुकीच्या घडनाही घडणार नाहीत. याशिवाय कार्ड हरवले तरी ई-वॉलेटमधून पैसे काढता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com