कॉटनचे कपडे होणार महाग

कापसापासून (Cotton) बनवलेल्या कपड्याच्या किमती वाढल्याने कापड कंपन्याना फायदा मिळू शकते.
Cotton clothes will be expensive
Cotton clothes will be expensiveDainik Gomantak
Published on
Updated on

सामान्य माणसाच्या खिशाला आणखी एकदा कात्री बसणार आहे. सणापूर्वी कापसापासून बनवलेले कपडे (Clothes) महाग होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव 10 वर्षात प्रथमच उच्चांक गाठला आहे. यंदा अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने कापसाचे दर वाढू शकतात. आता एकापाठोपाठ सणांचा (Festival) हंगाम सुरू होणार आहे. येणारे सण म्हणजे दसरा , दिवाळी होय. यानिमित्ताने लोक नवीन कपडे खरीदी करतात. पण यंदा सणांमध्ये सूती कपडे ( Cotton Clothes) खरेदी करणे महाग पडू शकते. पण कापसापासून (Cotton) बनवलेल्या कपड्याच्या किमती वाढल्याने कापड कंपन्याना फायदा मिळू शकते. ग्रामिस, रेमंड्ससारख्या कंपन्याना (Companies) फायदा होऊ शकतो.

* कापूस महाग का झाले?

गेल्या वर्षीच्या तुलनेत आज 6 टक्के कमी क्षेत्रात कापसाच्या पिकांची लागवड होते. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने कापसाचे भाव वाढले आहेत. 2011 नंतर भारतात 10 ते 12 टक्के वाढ झाली आहे. सध्या कापसाचा भाव 6, 500 - 7000 रुपये प्रती क्विंटल आहे. तर कापसाचा सरकारी भाव 5, 725 रुपये प्रती क्विंटल आहे. तसेच अमेरिकेत मुसळधार पावसामुळे कापसाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. चीनमध्ये कापसाला मोठी मागणी आहे, ज्यामुळे सूत उत्पादन कंपन्यांची मागणी वाढू शकते.

Cotton clothes will be expensive
राकेश झुनझुननवालांनी टाटाच्या शेअर्समधून महिनाभरात कमावले 170 कोटी

* सूट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा फायदा

सूत उत्पादक कंपन्यांना कापसाचे भाव वाढल्याचा फायदा होऊ शकतो. आज व्यापारात रेमंड्स 1.73 टक्के, स्पोर्टिंग इंडिया 4.99 टक्के, सियाराम सिल्क 1.57 टक्के वाढला आहे.

* शेतकऱ्यांना नफा मिळेल

कापसाचे भाव वाढल्ल्याचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या बाजारात कापसाची किंमत 6500 रुपये प्रती क्विंटलपेक्षा जास्त आहे. कापसाचा शासकीय भाव 5725 रुपये प्रती क्विंटल आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना प्रती क्विंटल एक हजार रुपये मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com