Silicon Valley Bank: एलन मस्क सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेणार?

ट्विटमधून दिले संकेत
Elon Musk
Elon Musk Dainik Gomantak

Silicon Valley Bank: अमेरिकेसह संपूर्ण जगभरात स्टार्टअपसाठी निधी पुरवणाऱ्या सिलिकॉन व्हॅली बँकेवर मोठे संकट आले आहे. या बँकेची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत झाल्याने अमेरिकन नियामकाने या बँकेला टाळे लावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ही बातमी दिवाळखोर झाल्याने भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, जगातील टॉप सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत टॉप टुमध्ये असलेल्या एलन मस्क यांनी ही बँक खरेदी करण्यात स्वारस्य दाखवल्याचे समजते.

Elon Musk
Silicon Valley Bank: अमेरिकेतील सर्वात मोठी बँक दिवाळखोर

रेझरचे सीईओ मिन लियांग टॅन यांनी याबाबतचे एक ट्विट केले होते. या ट्विटला एलन मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. मिन लियाँग टॅन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एलन मस्क यांनी संकटाने घेरलेली एसव्हीबी बँक खरेदी करावी आणि तिची डिजिटल बँक बनवावी.

रेझरच्या सीईओच्या ट्विटला उत्तर देताना टेस्लाचे सीईओ एलन मस्क म्हणाले की, मी या कल्पनेचे स्वागत करतो. अशा स्थितीत एलन मस्क यांना ही बँक खरेदी करण्यात रस आहे आणि ते ते खरेदी करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, एसव्हीबी बँक बुडल्यामुळे 2008 नंतरचे हे सर्वात मोठे बँकिंग संकट समजले जात आहे. या समुहाचे समभाग 70 टक्क्यांनी घसरले होते. कॅलिफोर्निया बँकिंग नियामकाने ही बँक बंद करून फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला रिसिव्हर म्हणून नियुक्त केले आहे.

SVB फायनान्शिअल ग्रुपच्या प्रमुखांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे कर्मचाऱ्यांना सांगितले की, बँकिंग नियामकासह भागीदार शोधण्याचे काम केले जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 27 फेब्रुवारी रोजी या बँकेचे अध्यक्ष ग्रेग बेकर यांनी कंपनीचे 3.6 दशलक्ष डॉलर किमतीचे शेअर्स विकले. यापूर्वी 12,451 शेअर्स पहिल्यांदा विकले गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com