Tata Harrier And Safari: टाटा हॅरियर, टाटा सफारी पेट्रोल इंजिनमध्ये का मिळत नाही? जाणून घ्या कारण...

ऑटो एक्सपो 2023 मध्ये टाटाने सादर केली हॅरियर ईव्ही
Tata Harrier And Safari
Tata Harrier And SafariDainik Gomantak
Published on
Updated on

Tata Harrier And Safari: टाटा मोटर्स कंपनीतर्फे पेट्रोल आणि डिझेल दोन्हींवर चालणारी वाहने बनवतात. त्यातच आता कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन विभागानेही मोठी झेप घेतली आहे.

शिवाय कंपनीची CNG सेगमेंटमध्येही चांगली पकड आहे. नुकतेच टाटाने ऑटो एक्सपो 2023 मध्ये त्यांच्या हॅरियर ईव्हीचे (इलेक्ट्रिक व्हेईकल) सादरीकरण केले.

Tata Harrier And Safari
Kishore Biyani Resigns: 'बिग बझार'चे संस्थापक किशोर बियाणींचा राजीनामा...

या वर्षी, 2023 ऑटो एक्स्पोमध्ये, वाहन उत्पादक टाटा कंपनीने आपल्या अनेक आलिशान गाड्या सादर केल्या. यामध्ये इलेक्ट्रिक कार, फ्युचर कॉन्सेप्ट कार, एसयूव्ही अशा अनेक सेगमेंटमधील कार्सचा समावेश आहे.

काळाची गरज लक्षात घेऊन कंपनी इलेक्ट्रिक कार्सही आणत आहे. हॅरियर आणि सफारी एसयूव्ही ही कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे. परंतु कंपनी प्रत्येक कारच्या मॉडेलमध्ये प्रत्येक इंजिन असलेला पर्याय देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला हॅरियर आणि सफारी या कार्स केवळ डिझेल इंजिनमध्येच मिळतात.

Tata Harrier And Safari
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

हॅरियर आणि सफारीमध्ये फक्त डिझेल इंजिन का?

हॅरियर आणि सफारी पेट्रोल इंजिनमध्ये बनविण्याच्या कामाला विलंब होत असल्याचे कंपनीचे मत आहे. ग्राहकांच्या अपेक्षांवर खरे उतरणे कठीण आहे.

हॅरियर आणि सफारी सारखे मॉडेल शोधणारे ग्राहक डिझेल इंजिनला प्राधान्य देतात, असे कंपनीला वाटते. पेट्रोल-इंजिन हवे असलेल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक सेगमेंट निवडण्याचा पर्याय देखील आहे.

टाटा ने ऑटो एक्सपो 2023 मध्ये हॅरियर ईव्हीचे प्रदर्शन केले आणि काही वर्षांत कंपनी त्याचे प्रकार देखील आणू शकते. कंपनीचे प्रतिस्पर्धी देखील तशीच रणनीती आखत आहेत. मारुती सुझुकी 2025 पर्यंत भारतात पहिली EV लाँच करणार आहे.

Hyundai कंपनी Kona EV आणत असून अलीकडेच Ioniq 5 लाँच केली आहे. Mahindra ने XUV400 नुकतीच लाँच केली आहे. MG मोटर इंडिया ZS EV आणत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com