आनंद महिंद्रांना का मागावी लागली ट्विटवरून जनतेला मदत?

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यावेळी काहीतरी विसरले की त्यांना ट्विटरवर लोकांना मदत मागावी लागली
 Anand Mahindra
Anand MahindraDainik Gomantak
Published on
Updated on

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) काहीतरी विसरले आणि त्यांनी चक्क ट्विट करून लोकांना मदत मागितली. ते दरवर्षी ही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण अपयशी ठरतात. आपण जाणून घेवूया काय आहे ती गोष्ट जी आनंद महिंद्रा नेहमी विसरतात.

अभिनंदन करायला विसरतात

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर भारताचा नकाशा शेअर केला आहे. त्यात लोहरी आणि मकर संक्रांतीचे सण देशाच्या विविध भागात कसे साजरे केले जातात याचा उल्लेख आहे. 'प्रत्येक वर्षी, मी यावेळी देशाच्या विविध भागांमध्ये साजरे होणाऱ्या कापणीच्या सणासाठी लोकांचे अभिनंदन करण्याचा प्रयत्न करतो. पण दरवर्षी मी अयशस्वी होतो आणि त्यातील काहींची नावे विसरतो. हा नकाशा देखील पूर्ण नाही, ज्यांच्याकडे या उत्सवाची संपूर्ण यादी असेल त्यांनी मला मदत करा, असे ट्विट करत त्यांना जनतेला मदत मागितली आहे.

 Anand Mahindra
Reliance Recruitment: 10 लाख लोकांना मिळणार रोजगार

दरवर्षी देशभरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोणत्या राज्यात या सणाचे विशेष महत्व आहे हे महिंद्रा विसरून जातात म्हणून त्यांना यावेळी जनतेची मदत घेत हा सण साजरा होणाऱ्या राज्यांची यादीच मागवली आहे.

आनंद महिंद्रा यांना मिळाले उत्तर

अनेकांनी त्यांच्या या प्रश्वाला ट्विट करून प्रतिक्रिया दिल्या. यापैकी एका वापरकर्त्याने @_Alrounder308 देशाचा दुसरा नकाशा शेअर केला आहे. यामध्ये लोहरी आणि मकर संक्रांती वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणत्या नावाने साजरी केली जाते याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

लॉन्च झाली Yezdi Bikes

महिंद्रा ग्रुपची कंपनी क्लासिक लीजेंड्सने गुरुवारी येझदी बाइक्स अॅडव्हेंचर, स्क्रॅम्बलर आणि रोडस्टरची तीन मॉडेल्स लाँच केली. या तीन मोटारसायकलींच्या लाँचिंगसाठी, आनंद महिंद्रा दुबईहून व्हिडिओ कॉलद्वारे जोडले गेले होते. या वाहनांची किंमत 1.98 लाख ते 2.09 लाख रुपयांपर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com