Rekha Jhunjhunwala: दरमहा 650 कोटींची कमाई करणाऱ्या रेखा झुनझुनवाला कोण आहेत?

रेखा यांनी शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याशी 1987 मध्ये लग्न केले.
Rekha Jhunjhunwala
Rekha JhunjhunwalaDainik Gomantak
Published on
Updated on

शेअर बाजारातील गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी 2023 हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये (Hurun Global Rich List) स्थान मिळवले आहे. रेखा झुनझुनवाला या दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. त्यांना बहुतेक मालमत्ता आणि स्टॉक पोर्टफोलिओ त्यांच्या पतीकडून वारसा मिळाला.

12 सप्टेंबर 1963 रोजी जन्मलेल्या रेखा झुनझुनवाला यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. 1987 मध्ये त्यांनी शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. दोघांना 3 मुले आहेत - निष्ठा, आर्यमन आणि आर्यवीर अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

Financialexpress च्या रिपोर्टनुसार, रेखा झुनझुनवाला दर महिन्याला सुमारे 650 कोटी रुपये कमावतात. Trendlyne च्या ताज्या अहवालानुसार, रेखा झुनझुनवा यांच्याकडे 29 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 25,655 कोटींच्या जवळपास आहे.

Rekha Jhunjhunwala
Hindenburg: हिंडेनबर्गचा डाव फसला, अदानी सारखा Block Inc विरोधातील अहवाल नाही ठरला फायदेशीर

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन, मेट्रो ब्रँड्स, स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स कंपनीसारख्या आघाडीच्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. बिझनेसइनसाइडरच्या अहवालानुसार झुनझुनवालाच्या एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे 40 टक्के गुंतवणूक एकट्या टायटनची आहे.

रेखा झुनझुनवाला प्रसिद्धीच्या झोतात नसतात. ऑगस्ट 2022 मध्ये पती राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर रेखा यांनी रेअर एंटरप्रायझेसची जबाबदारी स्वीकारली. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानुसार रेखा झुनझुनवाला या एकूण 4 कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. यामध्ये रेअर फॅमिली फाउंडेशन, रेअर इक्विटी, जलाराम बाबा चिल्ड्रन्स नेस्ट एज्युकेशन आणि मिनोशा डिजिटल सोल्युशन्स यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com