कधी येणार RBI चा डिजिटल RUPEE?

RBI डिजिटल चलनावर काम करत आहे. सध्या त्याचे तंत्रज्ञान आणि वितरणावर काम सुरू आहे.
When will RBI digital RUPEE come
When will RBI digital RUPEE come Dainik Gomantak
Published on
Updated on

RBI Governor: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी RBI पतधोरण जाहीर केले. धोरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी त्यांनी नमूद केल्या. सध्या रेपो दरात बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे सध्या तुमच्या कर्जावर कोणताही परिणाम होणार नाही. पण, यादरम्यान त्यांनी क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात जारी होणारे भारतातील पहिले डिजिटल चलन RUPEE बद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय बँक गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल चलनावर काम करत आहे. सध्या आम्ही डिजिटल रुपयाची कोणतीही टाइमलाइन जारी करू शकत नाही.' (When will RBI digital RUPEE come)

आरबीआय गव्हर्नर यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप कोणतीही टाइमलाइन निश्चित केलेली नाही. पण, ते FY23 च्या अखेरीस आणण्याची योजना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही त्यांच्या 2022 च्या बजेट भाषणात याचा उल्लेख केला होता. RBI डिजिटल चलनावर काम करत आहे. सध्या त्याचे तंत्रज्ञान आणि वितरणावर काम सुरू आहे. ही करन्सी कसे काम करणार, याची चौकटही तयार केली जात आहे.

When will RBI digital RUPEE come
RBIची क्रेडीट पॉलिसी जैसे थे, गव्हर्नर शशिकांत दास यांची माहिती

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC)

तज्ञांच्या मते, RBI च्या डिजिटल RUPEE चे नाव CBDC-Central Bank Digital Currency असू शकते. Krazybee चे CEO मधु एकंबरम यांच्या म्हणण्यानुसार, ते कसे असेल हे फारसे स्पष्ट झाले नाही. पण, डिजीटल स्वरूपात आम्हाला आमच्या बँक खात्यात रोख दिसत असल्याने आम्ही वॉलेटमधील शिल्लक तपासतो. काहींना ते तशाच प्रकारे पाहता येईल आणि ठेवता येईल. पण, तो 1 रुपया असेल की किती रक्कम असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ती करंन्सी सध्या कसे कार्य करते याबद्दल काहीही स्पष्ट झाले नाही.

When will RBI digital RUPEE come
शेळी पालन फायद्याचं, सरकारही करतंय मदत; असा करा अर्ज

क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळे कसे असेल?

क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे खाजगी आहे. त्यावर कोणी लक्ष ठेवत नाही आणि कोणत्याही सरकारी किंवा केंद्रीय बँकेचे नियंत्रण नाही. असे चलन बेकायदेशीर आहे. पण, ज्या चलनावर RBI काम करत आहे, ते RBI द्वारे पूर्णपणे नियंत्रित केले जाईल त्यासाठी सरकारची मान्यता असेल. बिटकॉइन सारखे डिजिटल रुपयाच्या प्रमाणावरही मर्यादा असणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरबीआयच्या नियमनामुळे मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग, फसवणूक होण्याची शक्यता राहणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com