जेव्हा देशामध्ये वसूल केला जात होता Gift Tax...

1958 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना नेहरूंनी 1957 मध्ये कृष्णमाचारी यांनी लादलेल्या करात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केले नाहीत.
Pandit Jawaharlal Nehru
Pandit Jawaharlal Nehru Twitter
Published on
Updated on

वर्ष होते 1958. अर्थसंकल्प (Beget 2022) सादर होण्यापूर्वी देशाचे तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी (T. T. Krishnamachari) यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. फेब्रुवारी 1958 मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर त्यांना आपले पद सोडावे लागले होते. अशा परिस्थितीत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी 1958-59 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता.

अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना नेहरू म्हणाले होते, "परंपरेनुसार, येत्या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करायचा आहे. अनपेक्षित आणि अस्वस्थ करणाऱ्या घडामोडींमुळे अर्थमंत्री आज येथे नाहीत. अगदी शेवटच्या क्षणी ही महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आली आहे."

Pandit Jawaharlal Nehru
EPFO: UMANG अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्या काढा PF खात्यातून पैसे

1958 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना नेहरूजींनी 1957 मध्ये कृष्णमाचारी यांनी लादलेल्या करात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केले नाहीत. मात्र, करचोरी रोखण्यासाठी 'गिफ्ट टॅक्स' नावाचा नवा कर जाहीर करण्यात आला. कर प्रस्तावाची घोषणा करताना नेहरू म्हणाले होते, "एखाद्याच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा सहकाऱ्यांना भेटवस्तूद्वारे मालमत्तेचे हस्तांतरण करणे हे केवळ इस्टेट ड्युटी नव्हे तर आयकर, संपत्ती कर आणि वेल्थ कर चुकवण्याचा सर्वात उत्तम मार्ग बनला आहे. हे रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे भेटवस्तूवर कर लावणे. अमेरिका, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये या प्रकारचा कर आधीपासून लागू आहे.

हे तथ्य जाणून घेणे देखील महत्त्वाचे

गिफ्ट टैक्सच्या तरतुदींमध्ये, पत्नीला दिलेल्या १ लाख रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंवर कर लागू होत नाही. मात्र, ऑक्टोबर 1998 मध्ये, गिफ्ट टैक्स रद्द करण्यात आला आणि सर्व प्रकारच्या भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त झाल्या. मात्र, 2004 मध्ये हा कर पुन्हा लागू करण्यात आला.

Pandit Jawaharlal Nehru
सरकारने आंतरराष्ट्रीय रोमिंग सिम कार्ड नियमांमध्ये केले बदल

कृष्णमाचारी यांनी 1957 च्या अर्थसंकल्पात दोन कर लादले

कृष्णमाचारी यांनी 1957 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना वेल्थ टैक्स आणि एक्सपेंडिचर टैक्स लागू केला होता. आपल्या निर्णयाचे औचित्य साधून त्यांनी एक वक्तव्यही केले होते. "असे वाटते की सध्याच्या आयकर कायद्यांमध्ये परिभाषित केलेले उत्पन्न कर भरण्याच्या वास्तविक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेसे नाही ...." हे ते वक्तव्य होते. त्यांनी वेल्थ टैक्स ला इनकम टैक्स पूरक असल्याचे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com