Whatsapp Down : ऐन दिवाळीत Whatsapp चा 'सर्व्हर डाऊन'; नेटकरी त्रस्त

Whatsapp Server Down : Whatsapp वापरकर्त्यांमध्ये नाराजी
Whatsapp Server Down
Whatsapp Server Down Dainik Gomantak

Whatsapp Server Down : नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, सगळीकडे सध्या whatsapp चा सर्व्हर डाऊन झाला आहे. अनेक वापरकर्ते Whatsapp वर मजकूर पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या नोंदवत असल्याने व्हॉट्सअॅपला अडचणी येत आहेत. जगभरातील ऑनलाइन आउटेजचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टर या वेबसाइटने व्हॉट्सअॅपच्या आउटेजची तक्रार करणाऱ्या वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ दर्शवली आहे.

(Whatsapp Server Down Latest News)

Whatsapp Server Down
Vitamin-E Benefits : व्हिटॅमिन-ई कॅप्सूल घेतल्याने काय फायदे होतात? जाणून घ्या कधी आणि कसे वापरावे

या परिस्थितीमुळे वापरकर्त्यांना मेसेज पाठवता येत नसून समोरून कुणाचेही मसेजेस घेता येत नाहीत. मेटाच्या मालकीचे लोकप्रिय इन्स्टंट कम्युनिकेशन अॅप व्हॉट्सअॅप जे जलद मजकूर पाठवण्यासाठी अनेकांकडून वापरले जाते. भारतातील व्हॉट्सअॅप वापरकर्ते सध्या मेसेज पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास असमर्थ आहेत.

WhatsApp वेब देखील आउटेजमुळे काम करत नसल्याचे दिसून आले आहे. अॅपचा वेब क्लायंट आता कनेक्ट होऊ शकत नाही. WhatsApp फक्त वैयक्तिक वापरासाठी नसून आता अनेक कामाच्या ठिकाणीही याचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. कामसंदर्भात अनेक गोष्टी WhatsApp च्या माध्यमातूनच पाठवल्या जातात. सध्याच्या परिस्थितीमुळे याचा परिणाम व्यावसायिक गोष्टींवरही झालेला दिसून येत आहे.

ही समस्या कधी पूर्ववत होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याने वापरकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com