WhatsApp कडून 'Emoji Reaction' फीचर आऊट; मॅसेजला प्रतिसाद देताना कसे वापराल?

Reactions On WhatsApp Messages:यामध्ये थम्प्स अप, हार्ट, स्मायली, सरप्राईज, थॅक्स आणि सॅड फेस इमोजींचा समावेश आहे.
WhatsApp
WhatsApp Dainik Gomantak
Published on
Updated on

अनेक मेसेजिंग अ‍ॅप वर तुमच्या मॅसेजला आता प्रतिसाद देण्यासाठी इमोजी असतात. फेसबूक मॅसेंजर युजर्स प्रमाणे मेटा ने आता ही सोय व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युजर्सला देखील दिली आहे. मार्क झुकरबर्गने फेसबूक वर माहिती देत आता व्हॉट्सअ‍ॅप रिक्शन ( Emoji Reaction) फीचर रोलआऊट केल्याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने सुरूवातीच्या टप्प्यामध्ये 6 इमोजी रोलआऊट केल्या आहेत. यामध्ये थम्प्स अप, हार्ट, स्मायली, सरप्राईज, थॅक्स आणि सॅड फेस इमोजींचा समावेश आहे. मार्क झुकरबर्गने आगामी काळात अजून काही इमोजी लॉंच करणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Reactions On WhatsApp Messages news)

व्हॉट्सअ‍ॅप (Whats App) वर इमोजी रिअ‍ॅक्शन इंस्टाग्राम, टेलिग्राम या अॅपसारखे काम करते. मग आता पहा व्हॉट्सअ‍ॅप वर हे 'व्हॉट्सअ‍ॅप रिक्शन फीचर' कस वापरता येईल?

* व्हॉट्सअ‍ॅप रिक्शन फीचर वापरण्यासाठी चॅट ओपन करावी .

* ज्या मेसेजवर तुम्हांला रीप्लाय द्यायची आहे तो मेसेज प्रेस करून होल्ड करा.

* नंतर तुम्हांला 6 इमोजींचा पॉप अप दिसेल. याद्वारा तुम्ही रिअ‍ॅक्शन देऊ शकाल.

* तुम्हांला 6 पैकी जी रिअ‍ॅक्शन द्यायची असेल त्याची निवड करा.

* इमोजी सिलेक्ट केलेल्या टेक्सच्याखाली दिसेल.

WhatsApp
मिलिटरी नर्सिंग मध्ये नोकरीच्या संधी,11 मे पासून करा अर्ज

व्हॉट्सअ‍ॅप कडून सध्या अनेक फीचर्सची टेस्टिंग सुरू आहे. येणाऱ्या काळात काही अपडेट्समध्ये अ‍ॅडमीनला ग्रुप मधील मेसेज डिलीट करता येणार आहे. तसेच 2 जीबी फाईल शेअरिंगचा ऑप्शन मिळेल. तसेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पोल फीचर लवकरच येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com