New Feature: WhatsApp वर एकाच वेळी 32 लोक जॉईन करू शकतील Video Call

WhatsApp New Video Call Feature: आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलमध्ये फक्त 8 लोक जॉईन करू शकत होते.
WhatsApp Video Call
WhatsApp Video CallDainik Gomantak
Published on
Updated on

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉलवर एक मोठी सुविधा देणार आहे . व्हॉट्सअ‍ॅपवर एकाच वेळी 32 लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतील. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅच्या व्हिडिओ कॉलमध्ये फक्त 8 लोक जॉईन होऊ शकत होते. वापरकर्ते कॉल ऑप्शनवर जाऊन 'कॉल लिंक' तयार करू शकतील आणि ते त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह शेअर करू शकतील. या फीचरसाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅ 'अपडेट' करावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपची (WhatsApp) मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले की, कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर 32 लोकांपर्यंतच्या ग्रुपसाठी व्हिडिओ कॉलच्या सुविधेची चाचणी सुरू केली आहे. सध्या आठ जण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलमध्ये जॉईन होऊ शकतात. मार्क झुकरबर्गने फेसबुक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्ही या आठवड्यापासून व्हॉट्सअ‍ॅपवर 'कॉल लिंक' फीचर (New Feature) आणत आहोत. जेणेकरून तुम्ही एका क्लिकवर कॉलमध्ये सामील होऊ शकता. आम्ही 32 लोकांपर्यंत सुरक्षित 'एनक्रिप्टेड' व्हिडिओ कॉलिंगची (Video Call) चाचणी घेत आहोत.

WhatsApp Video Call
Goa Petrol Diesel Price: कच्च्या तेलाचे दरात मोठा बदल, जाणून घ्या आज पेट्रोल-डिझेल कितीने स्वस्त?

अ‍ॅप अपडेट करावे लागेल
युजर्स कॉल ऑप्शनवर जाऊन 'कॉल लिंक' तयार करू शकतील आणि ते आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करू शकतील, अशी माहिती झुकरबर्गने (Mark Zuckerberg) दिली. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना कॉल लिंक वापरण्यासाठी अ‍ॅप 'अपडेट' करावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या सुविधेनंतर इतर अ‍ॅपला झटका बसू शकतो. कारण व्हॉट्सअ‍ॅप हे आधीच लोकांमध्ये खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे आणि लोकांना ते इतर अ‍ॅप्सपेक्षा जास्त वापरायला आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com