WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मिळणार 'हे' अनोखे नवे फीचर, जाणून घ्या खासियत...

व्हॉट्सअ‍ॅपवर आता असे फिचर येणार आहे ज्यामुळे चॅटिंग अधिक फास्ट होणार आहे.
WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureDainik Gomantak

WhatsApp New Feature: लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वापरकर्त्यांना नेहमीच नव नवे फिचर लॉन्च करत असते. जी प्रत्येकासाठी रिलीज होण्यापूर्वी बीटा आवृत्तीमध्ये चाचणी केली जातात.

मेटा-मालकीचे अॅप आता 'ऑडिओ चॅट्स' नावाचे एक नवे फिचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ज्याद्वारे चॅटिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सोपा आणि मजेदार होणार आहे. हे फिचर Android अॅप वापरणाऱ्या बीटा वापरकर्त्यांना दाखवण्यात आले आहे. 

WhatsApp अपडेट्सची माहिती देणारे WABetaInfo प्लॅटफॉर्मनुसार, अॅपच्या चॅट हेडरमध्ये आता एक नवीन वेवफॉर्म आयकॉन समावेश केला जात आहे. या आयकॉनवर टॅप केल्याने यूजर्सना थेट ऑडिओ चॅट्सचा पर्याय मिळेल आणि मॅसेज टाइप करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय, वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप कॉल दरम्यान येथे दर्शविलेल्या लाल बटणावरून कॉल डिस्कनेक्ट करण्याचा एक सोपा पर्याय देखील मिळेल.

  • ऑडिओ वेवफॉर्म सगळ्यात वर दिसेल

नवीन वेवफॉर्म आयकॉनमुळे असा अंदाज लावला जात आहे की, त्याचा फायदा रिअल-टाइम ऑडिओ व्हिज्युअलायझेशन दरम्यान उपलब्ध होईल. परंतु अहवालात असे म्हटले आहे की चॅट हेडरच्या वरची ही जागा ऑडिओ वेवफॉर्म दर्शवण्यासाठी राखीव ठेवली जाऊ शकते. म्हणजेच, किमान इंटरफेसमध्ये वापरकर्ते ऑडिओ मॅसेज प्ले करताना ऑडिओ वेवफॉर्म पाहत राहतील, जसे ते चॅटमधून बाहेर पडल्यावर ऑडिओ प्रोग्रेस बार दिसतो.

WhatsApp New Feature
Tax Rules: 'हे' पाच नियम 31मार्चनंतर बदलणार; आत्ताच जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान
  • सध्या डेवलपमेंट मोडमध्ये आहे हे फीचर

हे नवे फीचर डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित अधिक माहितीची प्रतीक्षा करावी लागेल. हे एकमेव फिचर नाही जे अॅपचा भाग बनवले जात आहे. ग्रुप अॅडमिन्सना आता मॅसेजिंग अॅपमध्ये मोठ्या ग्रुप व्हिडिओ कॉल होस्ट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे आणि 8 लोक व्हिडिओ कॉलमध्ये (Video Call) सामील होऊ शकतात आणि 32 लोक एकाच वेळी ऑडिओ कॉलमध्ये जॉइन होऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये अनेक उपकरणांना एका खात्याशी लिंक करण्याचा नवीन पर्याय देखील समाविष्ट करण्यात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com