Meta CEO Mark Zuckerberg: व्हॉट्सॲपने (Whatsapp) भारत सोडण्याची धमकी दिल्यानंतर मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग चर्चेत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाचे (Meta) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या पगाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेले झुकेरबर्ग यांचे उत्पन्न (Income) आणि खर्चाचा हिशेब पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अब्जावधी रुपयांचे मालक असलेल्या मार्क झुकरबर्ग यांचा मूळ पगार फक्त 1 डॉलर (1 Dollar) म्हणजेच भारतीय चलनात फक्त 83 रुपये आहे.
दरम्यान, मार्क झुकरबर्ग यांनी 2023 मध्ये मूळ वेतन म्हणून फक्त 1 डॉलर घेतले. चकित होऊ नका कारण हा केवळ एक भ्रम आहे. त्यांच्या पगारातील बहुतांश रक्कम त्यांची सुरक्षा आणि भत्ते म्हणून नोंदवली जाते. कंपनीला त्यांच्या सुरक्षेची इतकी काळजी आहे की, ती झुकरबर्ग यांच्या सुरक्षेवर $14,829,245 (सुमारे 120 कोटी रुपये) खर्च करते. या खर्चासह, एकूण 24.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 199 कोटी रुपये झुकरबर्ग यांच्या खर्च केले जातात. मेटाला त्यांच्या सुरक्षिततेबद्दल खूप काळजी आहे, काहीही असो, ते कंपनीसाठी महत्त्वाचे आहेत.
मार्क झुकेरबर्ग ज्यांना फक्त 83 रुपये पगार मिळतो. अधिकृतरित्या, त्यांचा पगार फक्त 1 डॉलर आहे, परंतु फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार त्यांना एकूण 24.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 199 कोटी रुपये पगार मिळतो. मूळ पगाराव्यतरिक्त ते बाकीचे विविध भत्ते घेतात. त्यांच्या सुरक्षेवर होणारा खर्चही यात समाविष्ट आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी फक्त 11 डॉलर एवढा पगार घेतला आहे. 2013 पासून ते $1 पगाराच्या क्लबमध्ये समाविष्ट आहेत. ते कमी पगार घेत असले तरी जगातील अब्जाधीशांच्या पहिल्या पाचमध्ये त्यांचा समावेश आहे. मार्क झुकेरबर्ग हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 155 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.