WhatsApp मध्ये 'ही' सेटिंग केली असेल, तर लगेच बदला, hi-hello न करता पैसे होतील गायब

जर तुम्हीही व्हॉट्सअॅपमध्ये ही सेटिंग केली असेल तर तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो.
WhatsApp Features Settings | WhatsApp Settings
WhatsApp Features Settings | WhatsApp Settings Dainik Gomantak

WhatsApp Settings : आज माणसाकडे खायला पैसे नसले तरी त्याच्याकडे स्मार्टफोन नक्कीच आहे. स्मार्टफोन ही आज आपल्या सर्वांची गरज बनली आहे. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि काही इन्स्टंट मॅसेजिंग अॅप्स नक्कीच असतात. इन्स्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुम्ही सुद्धा व्हॉट्सअॅपचा जास्त वापर करत असाल तर आता काळजी घेण्याची गरज आहे. खर तर हॅकर्स आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांचे पैसे क्लिअर करत आहेत आणि लोकांना त्याची माहिती नाही. 

तुम्ही सर्वांनी आजपर्यंत ऐकले असेल किंवा वाचले असेल की हॅकर्स लोकांचे मोबाईल हॅक करण्यासाठी फिशिंग लिंक पाठवतात, ज्यावर त्या व्यक्तीने क्लिक केल्यास त्यांचे खाते (Mobile) हॅक होते. पण आता हॅकर्स काळासोबत प्रगत झाले आहेत आणि त्यांनी मोबाईल फोन हॅक करण्यासाठी GIF तंत्र शोधून काढले आहे. याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोनमध्ये सहज प्रवेश करत आहेत.

  • तुमच्याकडे ही सेटिंग असेल तर लगेच बदला

अनेकांना व्हॉट्सअॅपमध्ये (Whats App) असलेल्या विविध वैशिष्ट्यांची माहिती नसते आणि ते सर्व सेटिंग्ज ऑन ठेवतात. याचा फायदा घेत हॅकर्स तुमचे पैसे (Money) काढून घेतात. जर तुम्हीही व्हॉट्सअॅपवर ही सेटिंग ऑन ठेवली असेल, तर ती ताबडतोब बंद करा. तुम्हीही फसवणूक किंवा हॅकिंगला बळी पडू शकता.

WhatsApp Features Settings | WhatsApp Settings
Health Tips: लठ्ठपणाच्या समस्येकडे लक्ष न दिल्याने होतील 'हे' गंभीर आजार

आता हॅकर्स GIF च्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. जिथे आधी हॅकर्स लोकांना फिशिंग मेसेज पाठवत असत, तिथे आता हॅकर्स GIF च्या माध्यमातून लोकांच्या मोबाईलमध्ये प्रवेश करत आहेत. हॅकर्स जीआयएफ इमेजमध्ये फिशिंग लिंक बसवत आहेत, जेणेकरून ती तुमच्या मोबाइल फोनमध्ये डाउनलोड होताच तुमचा मोबाइल फोन हॅक होईल. त्याला GIFShell असे नाव देण्यात आले आहे.

  • हॅकिंग कसे होत आहे?

बरेच लोक व्हॉट्सअॅपमध्ये 'ऑटो मीडिया डाउनलोड' हे फीचर चालू ठेवतात. यामुळे समोरून त्यांना जो काही संदेश पाठवला जातो, तो मोबाईलमध्ये आपोआप डाउनलोड होतो. अशा परिस्थितीत, जर हॅकर्सने तुम्हाला GIF पाठवले तर ते स्वयंचलितपणे डाउनलोड देखील होते आणि यामुळे हॅकर्सना तुमच्या मोबाइल फोनवर प्रवेश मिळतो. हॅकर्स नवीन तंत्रज्ञानाने हॅकिंग करत असून लोकांना याची माहिती नाही. हे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय बंद करा. हा पर्याय तुम्हाला स्टोरेज आणि डेटा अंतर्गत मिळेल. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com