WhatsApp Down: स्टेट्स अपडेट होईना, मेजेस जाईनात; व्हॉट्सॲप डाऊन, नेटकरी नाराज

WhatsApp Down: काही व्हॉट्सॲप युझर्सना स्टेटस अपलोड करण्यास अडचण आली, तर काहींना ग्रुपवर मेसेज पाठवताना समस्या येत आहे.
Users unable to send messages on WhatsApp
WhatsApp DownDainik Gomantak
Published on
Updated on

WhatsApp Down

सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग मोबाईल ॲपप्लिकेशन WhatsApp डाऊन असून अनेकांना त्याचा वापर करण्यात अडचण येत आहे. शनिवारी (१२ एप्रिल) सायंकाळी अनेक नेटकऱ्यांनी व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवण्यास आणि संदेश पाठवण्यास अडचण येत असल्याची तक्रार केली आहे.

Down Detector नुसार सायंकाळी ५.२२ पर्यंत अनेक व्हॉट्सॲप युझर्सना अडचणींचा सामना करावा लागला. याप्रकरणी ५९७ जणांनी अडचण येत असल्याचे नमूद केले. संदेश पाठवण्यास अडचणी येत असल्याची तक्रार जवळपास ८५ टक्के लोकांनी उपस्थित केली आहे. १२ लोकांना ॲप संबधित इतर तक्रारी केल्या आहेत तर ३ टक्के लोकांना लॉगिनची समस्या निर्माण झाली. Down Detector विविध प्लॅटफॉर्मच्या मदतीने अशा पद्धतीच्या आऊटेज संबधित माहिती एकत्रित करत असते.

काही व्हॉट्सॲप युझर्सना स्टेटस अपलोड करण्यास अडचण येत आहे, तर काहींना ग्रुपवर मेसेज पाठवताना समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर याप्रकरणी लोकांनी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी #Whatsappdown असा हॅशटॅग वापरुन व्हॉट्सॲप व्यवस्थित चालत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

"माझेच व्हॉट्सॲप डाऊन आहे का तुमचे देखील? मी स्टेट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करतेय पण फार वेळ घेत आहे", अशी तक्रार खुशबू शर्मा या महिलेने एक्सवरून केलीय.

"व्हॉट्सॲप Down आहे का? मला मेसेज पाठवण्यास अडचण येत आहे. कोणाला ही समस्या जाणवत आहे का?", असा प्रश्न अर्पित शुक्ला या व्यक्तीने एक्सवरुन उपस्थित केला आहे. अशा पद्धतीची तक्रार अनेकांनी इंस्टा, फेसबुकवरुन देखील केलीय. महत्वाची बाब म्हणजे या सर्व कंपन्या मेटाच्या मालकीच्या आहेत.

अशाच पद्धतीचे समस्या यापूर्वी फेब्रुवारीच्या महिन्यात आली होती. यामुळे जगभरातील अनेक युझर्सना व्हॉट्सॲप व्यवस्थित वापरण्यास अडचण येत होती. अनेकजणांना मेजेस पाठवण्यास, स्टेट्स ठेवण्यास तसेच, कॉल करण्यास अडचण आली होती.

दरम्यान, शनिवारी देशभरात अनेकांना युपीआय पेमेंट करण्यास अडचण निर्माण झाली. गुगल पे, फोन पेसह इतर अनेक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यानंतर आता व्हॉट्सॲप डाऊन झाल्याने अनेक युझर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com