अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरन्सी हा एक पसंतीचा गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. मोठ्या संख्येने लोक, विशेषतः तरुण, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या अटी जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांना योग्य मार्गाने गुंतवणूक करण्यास मदत होईल. यापैकी एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज (Cryptocurrency Exchange) देखील आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...
दरम्यान, लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करतात कारण त्यांना अल्पावधीत मोठा परतावा मिळेल. मात्र त्यात चढ-उतार होत राहिल्याने ते धोकादायकही आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे ट्रेडिंग (Buying And Selling) करणे. तुम्ही Bitcoin, Ethereum, Dogecoin, Cadence इत्यादी कोणत्याही क्रिप्टो कॉईनचा व्यापार करु शकता. हे ऑनलाइन एक्सचेंजद्वारे केले जाते, जिथे गुंतवणूकदार खाते उघडू शकतात आणि व्यापार सुरु करु शकतात.
क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज हे डिजिटल मार्केटप्लेस असून तिथे तुम्ही क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करु शकता. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही क्रिप्टोकरन्सी डिजिटल पद्धतीने आणि रुपया किंवा डॉलरच्या बदल्यात व्यापार करु शकता. हे प्लॅटफॉर्म खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. त्याबदल्यात कमिशन किंवा व्यवहार शुल्क आकारले जाते. CoinDCX, CoinSwitch Kuber, आणि UnoCoin ही काही ऑनलाइन एक्सचेंजेसची उदाहरणे असून जी भारतात आजतागायत अस्तित्वात आहेत. गुंतवणूकदार क्रिप्टो नाण्यांचे रुपांतर रुपये किंवा डॉलरमध्ये करण्यासाठी ऑनलाइन एक्सचेंज देखील वापरु शकतो. त्यानंतर ते त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढू शकतात.
क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कसे काम करते?
क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज क्रिप्टोकरन्सीचा खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात मध्यस्थ किंवा ब्रोकरेज कंपनी म्हणून काम करते. याद्वारे, खरेदीदार थेट बँक हस्तांतरण, UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन इत्यादी अनेक पद्धती वापरुन पैसे जमा करु शकतो. सेवांच्या वापरासाठी प्रत्येक व्यवहारावर कमिशन किंवा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
तसेच, खरेदीदार किंवा गुंतवणूकदाराला (Investors) सर्वप्रथम योग्य ऑनलाइन एक्सचेंज शोधणे आवश्यक आहे. यासाठी, प्लॅटफॉर्मचा इतिहास, विश्वासार्हता आणि ट्रेडिंगसाठी कोणते फायदे देणार याचा समावेश आहे. यानंतर तुम्हाला ट्रेडिंग खाते उघडावे लागेल, जे खूप सोपे आहे.
प्रथम तुम्हाला एक्सचेंज निवडावे लागेल, त्याचे अॅप डाउनलोड करुन खाते उघडावे लागेल. खाते उडताना तुम्हाला काही माहिती विचारेल जसे की ईमेल पत्ता. त्यानंतर, त्या ईमेल पत्त्यावर एक सत्यापन ईमेल पाठविला जाईल आणि केवायसी तपशील देखील विचारला जाईल. तुमच्या ईमेल आयडीवरील पत्त्याची पडताळणी केल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आणि त्यानंतर अॅपवर पासवर्ड टाका आणि तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास तयार व्हाल.
अॅप, वॉलेट किंवा एक्सचेंजशी संबंधित कोणतेही पासवर्ड गमावू नका. ते नंतर परत मिळू शकत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.