Flipkart
FlipkartDanik Gomantak

Walmart भारतात पाय पसरणार, Flipkart मध्ये एवढे अब्ज डॉलरची करणार गुंतवणूक

वॉलमार्ट फ्लिपकार्टच्या निधी उभारणीत धोरणात्मक गुंतवणूकदार आणू शकते.
Published on

किरकोळ बाजार क्षेत्रातील दिग्गज कंपनी वॉलमार्ट (Walmart) भारतात आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वॉलमार्ट ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्टमध्ये 3 अब्ज डॉलर पर्यंत गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे फ्लिपकार्टचे (Flipkart) मूल्य 40 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होणार आहे. अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

भारतातील डिजिटल कॉमर्स इकोसिस्टम विकसित आणि मजबूत करण्यासाठी Flipkart समुहाने गेल्या वर्षी जुलैमध्ये 3.6 अब्ज डॉलर गोळा केले आहेत. त्यानंतर Flipkart समूहाला 37.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉलमार्ट फ्लिपकार्टच्या निधी उभारणीत धोरणात्मक गुंतवणूकदार आणू शकते.

Flipkart
Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली मोठी घोषणा

फ्लिपकार्टला ऑनलाइन ई-कॉमर्स व्यवसायात पुढे जाण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक अतिशय महत्वाची राहणार आहे. फ्लिपकार्टकडून मात्र याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वॉलमार्टने देखील याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com