Go First मधून वाडिया ग्रुप बाहेर पडणार? गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू

मागील काही दिवसांपसून तोट्यात असणारी बजेट एअरलाइन गो फर्स्टची मालकी असलेल्या वाडिया समूह मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
Go First
Go FirstDainik Gomantak

Go First: मागील काही दिवसांपसून तोट्यात असणारी बजेट एअरलाइन गो फर्स्टची मालकी असलेल्या वाडिया समूह मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वाडिया समूहाने (Wadia Group) एअरलाइनमधील बहुसंख्य हिस्सा विकण्यासाठी किंवा पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी भागीदारांशी बोलणी सुरू केली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, गो फर्स्ट एअरलाइनला 2022 या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमान कंपनीला ऑपरेशनल समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील समस्यांमुळे GoFirst ची अर्धी विमाने ग्राउंड आहेत. गेल्या काही महिन्यांत या विमान कंपनीला व्यवसायात खूप नुकसान झाले आहे.

"GoFirst ने सुरुवातीला सरकारच्या इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) अंतर्गत 600 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय, गेल्या 15 महिन्यांत वाडिया समूहाने एअरलाइनमध्ये सुमारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशी माहिती विविध वृत्तांमधून समोर आली आहे.

Go First
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार DA गिफ्ट, पगारात होणार बंपर वाढ!

“आम्ही आमच्या ग्राउंड केलेल्या विमानासाठी पैसे खर्च करत आहोत. विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आम्ही गेल्या 15 महिन्यांत 3000 कोटी रुपये खर्च केले आहेत. असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

"इंजिन पुरवठ्यातील समस्यांमुळे, GoFirst ची सुमारे 60 टक्के विमाने जमिनीवर आहेत, ज्यामुळे एअरलाइनचे मोठे नुकसान झाले आहे." एअरलाइनला प्राथमिक बाजारातूनही निधी उभारता आला नाही, कंपनीने आयपीओ देखील पुढे ढकलला होता. GoFirst ने मे 2021 मध्ये ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला. आयपीओद्वारे 3600 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com