
सॅमसंगच्या फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये आता प्रतिस्पर्धी म्हणून विवोनेही भारतीय बाजारात आपली दमदार एन्ट्री केली आहे. विवोने आपला पहिलाच फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 5 भारतात लाँच केला असून, त्याची किंमत तब्बल १,४९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. विवोचा हा फोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज सादर करण्यात आला आहे. सध्या हो फोन टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध आहे.
कंपनीने या हाय-एंड स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू केले असून, ३० जुलैपासून तो फ्लिपकार्ट, अमेझॉन, तसेच विवोच्या अधिकृत ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत. १५,००० रुपयांपर्यंतचा इन्स्टंट बँक डिस्काउंट, तसेच जुन्या फोनच्या एक्सचेंजवर १५,००० रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. यासोबत १ वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी आणि Vivo TWS 3e इयरबड्स मोफत मिळणार आहेत.
Vivo X Fold 5 मध्ये ८.०३-इंचाचा मेन फोल्डेबल AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझोल्यूशन २४८० x २२०० पिक्सेल आहे. तसेच, ६.५३-इंचाचा कव्हर AMOLED डिस्प्ले असून, याचे रिझोल्यूशन २७४८ x ११७२ पिक्सेल आहे. दोन्ही डिस्प्ले १२०Hz हाय रिफ्रेश रेट आणि ४,५०० निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतात.
हा फोल्डेबल फोन नवीनतम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. तो Android 15 वर आधारित FountouchOS वर काम करतो. यामध्ये ६,०००mAh ची बॅटरी असून, ८०W वायर्ड आणि ४०W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
फोनच्या मागील बाजूस ५०MP + ५०MP + ५०MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेऱ्यासह OIS सपोर्ट दिला असून, टेलिफोटो लेन्सला ३x ऑप्टिकल झूम आणि १००x हायपरझूम सुविधा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मुख्य आणि कव्हर डिस्प्लेमध्ये २०MP कॅमेरा दिला आहे.
सॅमसंगच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी विवोने दमदार फोल्डेबल फोन सादर केला आहे. त्याची प्रीमियम किंमत, शक्तिशाली फीचर्स आणि आकर्षक ऑफर्समुळे बाजारात चांगली स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.