मोदी सरकारचे देशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना

अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) सेवा आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योग आणि पायाभूत सुविधा आणि हवामान बदल क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक पार पडली.
Narendra Modi

Narendra Modi

Dainik Gomantak

Published on
Updated on

अर्थसंकल्पाच्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिग्गज गुंतवणूकदारांची भेट घेतली. या गुंतवणूकदारांमध्ये सर्वोच्च खाजगी इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांचा समावेश होता, अधिकृत सूत्रांनुसार, पंतप्रधानांनी या गुंतवणूकदारांकडून जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारताला अधिक आकर्षक कसे बनवता येईल याबद्दल सूचना मागवल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजची चर्चा गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्यावर केंद्रित होती. भारतात व्यवसाय (Business) करणे अधिक सुलभ कसे करता येईल, याबाबत पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांकडून माहिती घेतली. त्याचबरोबर देशातील गुंतवणूक वाढवणे आणि सुधारणा प्रक्रिया पुढे नेण्यावरही चर्चा झाली.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi</p></div>
जागतिक दिग्गज नेत्यांना डावलत नरेंद्र मोदी पुन्हा अव्वल स्थानी

अर्थसंकल्पापूर्वी (budget) पंतप्रधान स्वत: पुढे जाऊन उद्योग क्षेत्रातील उच्च लोकांची भेट घेत त्यांचे मत आणि सूचना जाणून घेत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाल्याचे सूत्राने सांगितले. नोव्हेंबरच्या सुरुवातीला, पंतप्रधानांनी जगातील शीर्ष 20 गुंतवणूकदारांना भेटले, जे एकत्रितपणे $600,000 पेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करतात.

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार (Government) सातत्याने सुधारणांचे उपाय करत आहे. ज्याने व्यवसाय सुलभतेमध्ये भारताचे रँकिंग सुधारण्यास मदत केली आहे. यासोबतच सरकारने ऑटो सेक्टरपासून सेमीकंडक्टरपर्यंत उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन जाहीर केले आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका

पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीमुळे दुसरीकडे अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकाही सुरू आहेत. आज अर्थमंत्र्यांनी सेवा आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योग आणि पायाभूत सुविधा आणि हवामान बदल क्षेत्रातील तज्ज्ञांची दोन वेगवेगळ्या सत्रात बैठक घेतली.यापूर्वी गुरुवारी अर्थमंत्र्यांनी उद्योग संघटनांसोबत बैठक घेतली. ज्यामध्ये उद्योग संघटनांनी अर्थमंत्र्यांना मदत आणि सुधारणा उपाय सुरू ठेवण्यास सांगितले होते.

कर आणि धोरणे स्थिर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. 15 डिसेंबरपासून अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकांना सुरुवात झाली आहे. पहिल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी कृषी (Agriculture) आणि कृषी प्रक्रिया उद्योगातील तज्ञांशी चर्चा केली. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व क्षेत्रांशी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत करतात. यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेचे स्पष्ट चित्र तर मिळतेच, शिवाय त्यांना या क्षेत्राच्या मागण्याही कळतात आणि तज्ज्ञांकडून सूचनाही मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com