Cyber Security: फ्री वाय-फाय वापरताय ? बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं

Cyber Security: यामध्ये अनेक लहान चुकांमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते .असे नुकसान होऊ नये यासाठी काही काळजी घेतली पाहिजे.
cyber crime
cyber crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Security: आजकाल सायबर क्राईम वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी जातो.अनेकदा लाखो करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे.यामध्ये अनेक लहान चुकांमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते .असे नुकसान होऊ नये यासाठी काही काळजी घेतली पाहिजे.

अनेकदा बाहेर गेल्यानंतर फ्री वायफाय वापरले जाण्याची शक्यता अधिक असते.अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही वायफाय कनेक्ट केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. हॅकर्स यामाहितीआधारे,तुमच्या बॅंक अकाऊंटबद्दल माहिती मिळवू शकतात. आजकाल शासनाकडून वायफाय दिले जात आहे मात्र हेसुद्धा सुरक्षित असल्याची हमी देता येत नाही.

रेल्वे स्टेशन तसेच मेट्रो ( metro ) स्टेशनवर फ्री वायफायची सुविधा दिली जाते. अशा वायफायपासून सुरक्षित राहण्याची गरज असते. प्रायवेट कंपन्या याठिकाणी वाय फायची सुविधा पुरवतात. त्यामुळे तुमच्या माहितीचा वापर तुमच्या नकळत होऊ शकतो.

cyber crime
HDFC बॅंकेच्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, आजपासून लागू झाला 'हा' नवा नियम

फ्री वायफायचा तोटा फक्त बॅंक ( Bank ) अकाऊंट रिकामे होण्यापुरता नसून यातुन तुमचा मोबाईलदेखील हॅक होऊ शकतो. यासगळ्याबरोबरच, युआयडी आणि पासवर्ड सगळ्या ठिकाणी सारखेच असणे, इतरांना युआयडी आणि पासवर्ड माहित असणे यातुनदेखील तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. त्यामुळे फ्री वायफाय वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com