HDFC Ltd Prime Lending Rate: तुम्हीही HDFC लिमिटेड (HDFC Ltd.) कडून गृहकर्ज घेतले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. HDFC ने पुन्हा एकदा प्राइम लॅडिंग रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गृहकर्जाचा किमान व्याजदर 8.65 टक्के झाला आहे. नवे दर मंगळवारपासून म्हणजेच 20 डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. एचडीएफसीने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीमध्ये प्राइम लॅडिंग रेट 0.35 टक्क्यांनी वाढवून 8.65 टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
800 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्यांना ही सुविधा मिळेल
मे महिन्यापासून HDFC ने कर्जाचा दर 2.25 टक्क्यांनी वाढवला आहे. एचडीएफसीने सांगितले की, 8.65 टक्के नवा दर फक्त त्या ग्राहकांसाठी लागू होईल, ज्यांचा 'क्रेडिट स्कोअर' 800 किंवा त्याहून अधिक असेल. गृहकर्जाचा हा सर्वात कमी दर असल्याचा कंपनीचा दावा आहे. यापूर्वी, एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) दरमहा 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याची घोषणा केली होती. यासह बँकेच्या ग्राहकांना थेट लाभ देण्याची योजना आहे.
बँकेने ग्राहकांच्या हितासाठी योजना तयार केली
बँकेच्या वतीने दर महिन्याला 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याची योजना पूर्ण करण्यासाठी बँकेने ग्राहकांच्या फायद्यांशी संबंधित योजना तयार केली आहे. क्रेडिट कार्डवरील खर्च वाढवण्यासाठी ऑनलाइन रिटेलपासून ते फूड डिलिव्हरीपर्यंतच्या अनेक उद्योगांशी पार्टनरशिप करण्याची योजना आहे. बँकेचे कंट्री हेड पराग राव यांनी दिलेल्या माहितीत, सध्या ही संख्या 5 लाख आहे, ती 10 लाखांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, ग्राहकांना (Customers) कंपन्यांकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.